रेल्वेने कटून दोघांचा मृत्यू, एकाची आत्महत्या; दुसऱ्याचा पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:31 IST2023-08-11T17:30:25+5:302023-08-11T17:31:22+5:30

दोन्ही मृतक अज्ञात असून रेल्वे पोलिस शोध घेत आहेत

Two killed by train, one committed suicide; Another fell to his death | रेल्वेने कटून दोघांचा मृत्यू, एकाची आत्महत्या; दुसऱ्याचा पडून मृत्यू

रेल्वेने कटून दोघांचा मृत्यू, एकाची आत्महत्या; दुसऱ्याचा पडून मृत्यू

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा :भंडारा रोड रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेने कटुन दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एकाने मुंबई हावडा मेल या जलद गाडी समोर आत्महत्या केली तर दुसऱ्याचा धावत्या गाडीतून पडून मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दोन्ही मृतक अज्ञात असून रेल्वे पोलिस शोध घेत आहेत.

आज दुपारी १ वाजताच्या सुमारास मुंबई हावडा मेल या जलद रेल्वेसमोर भंडारा रोड रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या सोनूली रेल्वे पुलासमोर एका इसमाने उडी घेतली. दरम्यान ओव्हर ब्रिज खाली एक इसम धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. दोघांची वय जवळपास ४० ते ४५ आहे.

रेल्वेने पडून मृत्यू झालेल्या एका व्यक्तीजवळ जवळ मिळालेल्या कागदपत्रांनुसार मृतांचे नाव दत्तागिरी एडिगा असून तेलंगणा राज्यातील नंददयाल येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक सौम्य दत्ता व अरविंद टेभुर्णीकर करीत आहेत.

Web Title: Two killed by train, one committed suicide; Another fell to his death