दुर्दैवी घटना... शाळेतून घरी निघालेल्या विद्यार्थ्यास भरधाव ट्रॅक्टरने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 14:26 IST2021-11-27T14:26:05+5:302021-11-27T14:26:59+5:30

मासळची घटना : शाळेतून घरी जाताना अपघात

A tractor crushed a student on his way home from school in bhandara | दुर्दैवी घटना... शाळेतून घरी निघालेल्या विद्यार्थ्यास भरधाव ट्रॅक्टरने चिरडले

दुर्दैवी घटना... शाळेतून घरी निघालेल्या विद्यार्थ्यास भरधाव ट्रॅक्टरने चिरडले

ठळक मुद्देपारस शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सायकलने खैरीघर येथून मासळ येथे शाळेत गेला. शाळा आटोपून सकाळी ११ वाजता सायकलने गावाकडे जात होता.

लाखांदूर (भंडारा) : शाळा आटोपून सायकलने गावी परतणाऱ्या सातव्या वर्गातील विद्यार्थ्याला एका भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील मासळ ते खैरीघर रस्त्यावरील तलावाजवळ ही दुर्घटना घडली. पारस माधवराव मेश्राम (१३) रा. खैरीघर असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मासळ येथील सुबोध विद्यालयात सातव्या वर्गात शिकत होता. 

पारस शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सायकलने खैरीघर येथून मासळ येथे शाळेत गेला. शाळा आटोपून सकाळी ११ वाजता सायकलने गावाकडे जात होता. त्यावेळी मासळ ते खैरीघर रस्त्यावरील तलावाजवळ भरधाव ट्रॅक्टरने (एमएच ३६ एल ३६४०) सायकलला मागून जोरात धडक दिली. ट्रॅक्टरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने चिरडून पारस जागीच ठार झाला. या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस अमलदार मनिष चव्हाण, अनिल साबळे, पोलीस नायक भोयर, रोकडे, अनिल राठोड यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टर चालक प्रमोद लालाजी दोनोडे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
 

Web Title: A tractor crushed a student on his way home from school in bhandara