'2014 ला ट्रेलर दाखवला, आता पिच्चर दाखवा'; भंडाऱ्यात चक्क मुद्द्यांवर बोलले मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 16:49 IST2019-10-13T16:48:46+5:302019-10-13T16:49:33+5:30
मोदींनी आपल्या भाषणात आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्जला गॅस योजना, जनधन योजनांचा पाढा वाचून दाखवला. तसेच गरिबांसाठी काम करणारं हे सरकार आहे

'2014 ला ट्रेलर दाखवला, आता पिच्चर दाखवा'; भंडाऱ्यात चक्क मुद्द्यांवर बोलले मोदी
भंडारा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावनंतर भंडारा जिल्ह्यातील साकोली येथेही आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतूनच केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाष्ट्रातील पहिली सभा रविवारी जळगावात झाली. त्यानंतर साकोली येथील दुसऱ्या सभेत बोलताना मोदींनी प्रथम लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तोंड भरून कौतुक करत मोदी चक्क महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलले.
मोदींनी आपल्या भाषणात आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्जला गॅस योजना, जनधन योजनांचा पाढा वाचून दाखवला. तसेच गरिबांसाठी काम करणारं हे सरकार आहे. या देशातील वंचित, पीडित, शोषित लोकं ही आमची कुटुंब आहेत, ते आमचेच लोकं आहेत. मोदींनी साकोली येथील भाषणात, आदिवासींचा विकास, शेती, शिक्षण, रस्तेविकास, आरोग्य, औद्योगिक आणि शेतकऱ्यांचा विकास यांसह अनेक प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, 2014 साली तुम्ही ट्रेलर दाखवला होता, आता पिच्चर दाखवा, असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, यापूर्वी जळगाव येथील सभेत मोदींनी 370 चा मुद्दा उचलला होता. आमच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक नाही. जे सांगतो ते करतोच. जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविल्याने देशातील काही राजकीय नेते व पक्ष देश हिताच्या निर्णयावरून राजकारण करीत आहे.त्यांनी या व आगामी कोणत्याही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 370 कलमचा उल्लेख करून दाखवावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात विरोधकांना दिले.