मावशीच्या घरी गेलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा टाकीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 23:22 IST2022-05-11T23:22:24+5:302022-05-11T23:22:59+5:30

मोहाडी तालुक्यातील काटी येथील घटना

One and a half year old Chimukalya, who went to his aunt's house, fell into a tank and died | मावशीच्या घरी गेलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा टाकीत पडून मृत्यू

मावशीच्या घरी गेलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा टाकीत पडून मृत्यू

आंधळगाव (भंडारा) : मावशीकडे पाहुणा म्हणून आलेला दीड वर्षाचा चिमुकला  घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाक्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना दुर्दैवी घटना घडली. मोहाडी तालुक्यातील काटी येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

जय संदीप बांते रा. खोकरला असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी तो आई व वडिलांसोबत मावशीच्या गावी काटी येथे कडव यांच्याकडे आला होता. सायंकाळी घरातील मंडळी जेवण करीत होती. त्यावेळी जय खेळत-खेळत घराबाहेर गेला, बाहेर असलेल्या टाकीत तो पडला. अर्ध्या तासानंतर जय दिसत नाही, म्हणून शोध सुरु झाला. तेव्हा तो टाक्यात मृतावस्थेत आढळून आला. जयचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला. संपूर्ण गाव येथे गोळा झाले होते. प्रत्येक जण चिमुकल्याचा मृतदेह पाहून हळहळत होते.
 

Web Title: One and a half year old Chimukalya, who went to his aunt's house, fell into a tank and died