मोदी सरकार उद्योगपतींच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:03 IST2019-04-07T01:02:40+5:302019-04-07T01:03:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा / लाखनी : भाजप सरकारने अच्छे दिनाच्या नावाखाली जनसामान्यांची गळचेपी केली आहे. २ कोटी रोजगार ...

Modi government backs industrialists | मोदी सरकार उद्योगपतींच्या पाठीशी

मोदी सरकार उद्योगपतींच्या पाठीशी

ठळक मुद्देछगन भुजबळ : लाखनी व भंडारा येथे प्रचारसभा




लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा / लाखनी : भाजप सरकारने अच्छे दिनाच्या नावाखाली जनसामान्यांची गळचेपी केली आहे. २ कोटी रोजगार देण्याऐवजी मोदी सरकार उद्योगपतींच्या पाठीशी असून या देशाची लूट करीत आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
लाखनी व भंडारा येथे राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. भुजबळ म्हणाले की, भाजप शासनाच्या काळात महागाईने उच्चांक गाठला. बेरोजगारीचा रेशियोही वाढला आहे. जनसामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी त्या वाढतच गेल्या. उज्ज्वलाच्या धुराने तर महिलांना रडू कोसळले आहे.
राफेलचा महाघोटाळा केला. भाजप सरकार सर्वच बाबतीत सपेशल फेल ठरली असून या सरकारला पुन्हा निवडून दिल्यास स्वत:चीच फसवणूक होईल. नाना पंचबुद्धे यांचे हात बळकट करून राष्ट्राच्या सक्षम उभारणीत सहभाग द्या, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी लाखनी येथे आयोजित सभेला माजी आमदार सेवक वाघाये, दामाजी खंडाईत, अविनाश ब्राम्हणकर, वृषाली खेडीकर, कृष्णा रोकडे, ज्ञानेश्वर राहांगडाले, आकाश कोरे, होमराज कापगते आदी उपस्थित होते. भंडारा येथील सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, सुनील फुंडे, जिया पटेल, राजू कारेमोरे, महेंद्र गडकरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Modi government backs industrialists