"शेतकऱ्यांना एक लाख द्या... अन्यथा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ" खासदार पडोळेंच्या धमकीने राजकीय क्षेत्रात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:09 IST2025-11-05T14:08:37+5:302025-11-05T14:09:39+5:30
Bhandara : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एक लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाही तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, असा धमकीवजा इशारा भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे.

"Give one lakh to farmers... otherwise we will blow up the Prime Minister and Chief Minister" MP Padole's threat creates a stir in the political arena
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एक लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाही तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, असा धमकीवजा इशारा भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. या वक्तव्यासंदर्भात पडोळे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला तसे म्हणायचे नव्हते. उडवून देऊ म्हणजे खुर्चीवरून ओढू असे म्हणायचे होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली.
सोमवारी भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन दिल्यानंतर विश्रामगृहात त्यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना हे वक्तव्य केले. शेतकऱ्यांना राज्य सरकारने फक्त १८ रुपये पीक विमा दिला. त्यात शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही. शेतकऱ्यांना न्याय आणि हक्क द्या. यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत; तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही उडवून देऊ, असे ते म्हणाले.
पडोळे यांचे वक्तव्य बालिशपणाचे : बावनकुळे
नागपुरात माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, खासदार पडोळे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचे असल्याची टीका केली. ते म्हणाले, पडोळे पहिल्यांदाच खासदार झाले. त्यांना बोलण्याचे तारतम्य नाही. अपघाताने खासदार झाल्याने त्यांच्यात प्रगल्भता नाही. निदान काय बोलावे हे त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घ्यावे.