रानडुकराची दुचाकींना जोरात धडक, चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 14:20 IST2023-08-19T14:19:28+5:302023-08-19T14:20:27+5:30
करडी ते मोहगाव रस्त्यावरील घटना

रानडुकराची दुचाकींना जोरात धडक, चार जखमी
देवानंद नंदेश्वर
भंडारा : मुलीचा औषधोपचार झाल्यानंतर घरी दुचाकींनी जात असताना रानडुकाराने धडक दिली. यात जण जखमी झाले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील करडी ते मोहगाव रस्त्यावर घडली.
दुधराम लिंबा तितीरमारे (५०), विनोद कुंडलिक मोहतुरे (४०), दामिनी विनोद मोहतुरे (१०), विशाल विनोद मोहतुरे (८), सर्व रा. निलज खुर्द अशी जखमींची नावे आहेत.
दामिनी मोहतुरे हिची प्रकृती बरोबर नसल्यामुळे करडी येथे खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आला. त्यानंतर दोन दुचाकींनी स्वगृही जात असताना रानडूकराने धडक दिली. यात दुचाकीवरील चारही जण जखमी झाले. जखमींना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र शेंडे यांनी वनविभागला घटनेची माहिती देताच वनरक्षक मोहन हाके, विष्णू धार्मिक यांनी घटनास्थळी जावून मोका पंचनामा केला आहे. चारही जखमीला वनविभाग अंतर्गत आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.