भंडारा-बालाघाट महामार्ग, पाच वर्षांपासून घोषणेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:54 IST2025-06-09T14:53:12+5:302025-06-09T14:54:37+5:30

Bhandara : एकाही कामाला सुरुवात नाही, १०० किमी अंतरचा महामार्ग अडला

Bhandara-Balaghat highway, under announcement for five years | भंडारा-बालाघाट महामार्ग, पाच वर्षांपासून घोषणेतच

Bhandara-Balaghat highway, under announcement for five years

रंजित चिंचखेडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) :
भंडारा-बालाघाट या दोन जिल्ह्यांतील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. घोषणेला पाच वर्षे झाले आहेत. परंतु प्रत्यक्षात एकाही कामाला सुरुवात करण्यात आली नाही. याउलट अरुंद असणाऱ्या महामार्गाने अनेक दुचाकी चालकाचा बळी घेतला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग की मृत्यूचा महामार्ग अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.


भंडारा-बालाघाट या १०५ किमी अंतरच्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग पाच वर्षांपूर्वी घोषित करण्यात आले. राज्याने केंद्राला हस्तांतरण केले नसल्याचे चर्चा आलेल्या होत्या. यामुळे महामार्गाचे कामांना विलंब होत असल्याचे चर्चा पेरण्यात आल्या होत्या.


परंतु महामार्गाची कामे कुठे अडली. हे खऱ्या अर्थाने कुणी सांगितले नाही. महामार्गाच्या चौपदरीकरणाची खरी गोम निदर्शनास आली नाही. महामार्गाचे चौपदरीकरण घोषणेत तीन टप्प्यात मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. यात भंडारा ते तुमसर, तुमसर ते वाराशिवनी, आणि वाराशिवनी ते बालाघाट असे हे टप्पे असले तरी गेल्या पाच वर्षापासून कामाचा ठणठणपार आहे. जागेचे अधिग्रहण अडले आहे. विजेचे खांब थेट महामार्गावर आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडेही महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष आहे.


पुलाचे बांधकाम अरुंद झाले आहेत. महामार्ग खड्ड्यात गेला आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी नाक तोंड दाबले जात आहे. केंद्र सरकारकडे राज्य मार्गाचे हस्तांतरण करण्यात आले असल्याने राज्याचा सार्वजनिक बांधकाम महामार्ग दुरुस्तीवरून उदासीनता दाखवीत आहे. पाच वर्ष लोटुनही बांधकामाला प्रारंभ न झाल्याने हा महामार्ग अजुन किती वर्ष असाच विस्तारीकरणाविना खितपत राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


या मार्गावर वाढली वाहतुकीची वर्दळ
या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले. बरेच काही वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीकडे डोळेझाक केले. परिणामतः महामार्गावर खिंडाऱ्या पडल्या. या खिंडाऱ्यात दुचाकी चालक कोसळले. अनेक दुचाकी चालकांचे जीव गेले. अनेक दुचाकी चालकांचे हात पाय तुटले. अनेकांना गंभीर दुखापत झाली. तरीही महामार्गचे कामांना सुरुवात करण्यात आली नाही. महामार्गावर तीन नद्या आडव्या आलेल्या आहे. तिन्ही नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहेत.


समृद्धी महामार्गला भिडणारा राष्ट्रीय महामार्ग
गोंदियापर्यंत समृद्धी महामार्गचे विस्तार होणार आहे. मोहाडी शहरातून समृद्धी महामार्ग जाणार आहे. याच शहरातून भंडारा बालाघाट वेगळ्या दिशेने जाणार आहे. दोन्ही महामार्ग मोहाडी शहरातून जाणार असल्याने व्यापार वाढणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे कामे सुरू होणार असल्याचे कारणावरून महामार्गाचे शेजारी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी नवीन घराचे बांधकाम थांबविले आहेत.


कान्हा किसली अभयारण्याला जोडणारा
या महामार्गावर ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ येणार आहे. मध्य प्रदेशातील कान्हा किसली अभयारण्याला जोडणारा महामार्ग ठरणार आहे. यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अपघातावर नियंत्रण येणार आहे

Web Title: Bhandara-Balaghat highway, under announcement for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.