‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:05 IST2025-08-26T12:01:48+5:302025-08-26T12:05:39+5:30

Numerology Ganesh Chaturthi Ganpati August 2025: गणेशाची शाश्वत कृपा असली, तरी गणेशोत्सवात या मूलांकाच्या व्यक्तींनी काही अगदी सोपे उपाय करणे उपयुक्त मानले गेले आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या...

ganpati 2025 ank shastra in marathi these 3 birth dates people numerology number mulank 5 is lucky money never runs out ganesh laxmi and budh gives immense prosperity | ‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!

‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!

Numerology Ganesh Chaturthi Ganpati August 2025: १४ विद्या, ६४ कलांचा अधिपती गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा हा देव आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. २७ ऑगस्ट २०२५ रोजी भाद्रपद शुद्ध श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. काही राशी गणपतीच्या अगदी आवडत्या सांगितल्या आहेत, त्यांच्यावर गणेशाची कायम कृपा असते, असे म्हटले जाते. तसेच अंकशास्त्रातील एक मूलांक असा आहे, ज्यावर गणपतीचा कालातीत वरदहस्त असतो, असे मानतात. जाणून घेऊया...

५ राशींवर गणपती बाप्पाची कायम कृपा, अपार बुद्धी, कालातीत लाभ; भरघोस भरभराट, भाग्योदय होतो!

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठी वर्षांत गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते. भाद्रपदातील गणेश चतुर्थी हा सर्वांच्या परमोच्च आनंदाचा दिवस. अशा या प्रथमेश गणपती मूलांक ५ वर नेहमी कृपादृष्टी ठेवून असतो, शुभाशिर्वाद देतो, असे सांगितले जाते. 

बुद्धी आणि विवेकाची अधिपती देवता गणपती

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक शास्त्र आहे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४ आणि २३ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. बुध हा मूलांक ५ चा स्वामी आहे. काही मान्यतांनुसार, बुधाची अधिपती देवता गणपती असल्याचे म्हटले जाते. गणपती बुद्धी आणि विवेकाची देवता आहे. 

८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!

लक्ष्मी देवाची शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात

पंचांग, नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. अंकशास्त्राच्या माध्यमातूनही भविष्यकथन करता येते. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींवर धनदेवता कुबेरांची विशेष कृपा असते. तसेच या मूलांकाच्या व्यक्तींना लक्ष्मी देवाची शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते. यामुळे पैशांची चणचण भासत नाही, आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. धनलाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. 

तर्क क्षमता अन् संवाद कौशल्य उत्तम

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुध वाणीचा कारक मानला गेला आहे. आपल्या बोलण्याने वाणीमुळे समोरच्या व्यक्तींवर प्रभाव पडतो. तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते. जनसंपर्क, मित्र परिवार खूप मोठा असतो. कौटुंबिक जीवनही आनंदी असते, असे म्हटले जाते. 

प्रतिभावान, धाडसी, निर्भयी आणि मेहनती

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव मनमिळाऊ असतो. या मूलांकाचे लोक प्रतिभावान असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात, असे मानले जाते. 

कोणते क्षेत्र ठरते भाग्यकारक, होते उत्तुंग भरारी, यश-प्रगती?

मूलांक ५ असलेल्या लोकांना व्यापार, उद्योगात चांगले यश मिळते. हे लोक मनी माइंडेड आणि बिझनेस माइंडेड असतात. व्यवसायात जोखीम पत्करायला ते नेहमीच तयार असतात. नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात. आव्हाने स्वीकारतात आणि कोणत्याही परस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात.  बँकिंग, शिक्षण, प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू शकतात. या व्यक्तींना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान असते, असे सांगितले जाते. 

जीवनातील सर्व सुख, पैशाची कधीच कमतरता नसते

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींना भाग्याची आणि नशिबाची उत्तम साथ मिळते. यासह नेहमी पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतात. कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते. या व्यक्ती बुद्धिमान असतात. लहान वयात ते मोठ्या हुद्यावर पोहोचतात. कामे करून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. पैशाची कधीच कमतरता नसते. ते पहिल्यापासूनच त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतात.

गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींनी गणपती उत्सवात काय करावे?

- गणपतीला दुर्वा अर्पण करा.

- हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा.

- बाप्पाला हिरव्या रंग असलेली मिठाई, गोड पदार्थ अर्पण करा.

- मुलांना वाचन आणि लेखन साहित्य भेट द्यावे.

- गोमातेला हिरवा चारा द्या.

- गणेश मंत्रांचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.

- गणेशा आराधना केल्याने शत्रू आणि ग्रहांच्या अशुभ दृष्टीपासून रक्षण होते.

- गणेश उपासना केल्याने कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते.

- धन, बुद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते.

- बुद्धीदाता गणेश जीवन संपत्ती आणि धनधान्याने भरतो.

- नोकरी, व्यवसाय आणि करिअरमधील सर्व अडथळे, विघ्न दूर करतो. 

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: ganpati 2025 ank shastra in marathi these 3 birth dates people numerology number mulank 5 is lucky money never runs out ganesh laxmi and budh gives immense prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.