Video: प्रवाशांनी भरलेल्या ST महामंडळाच्या बसने घेतला पेट, परळीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 22:28 IST2023-10-20T22:27:05+5:302023-10-20T22:28:32+5:30
लातूरहून परळीमार्गे परभणीला निघालेल्या एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत बसने अचानक पेट घेतला.

Video: प्रवाशांनी भरलेल्या ST महामंडळाच्या बसने घेतला पेट, परळीतील धक्कादायक घटना
- संजय खाकरे
परळी- बीड जिल्ह्यातील परळी शहरात मोठी घटना घडली आहे. लातूरहून प्रवाशी घेऊन परळी मार्गे परभणीकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमध्ये 20 प्रवासी होते. चालकाने वेळीच बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, वायरचे स्पार्किंग आणि टायर फुटल्याने आग लागली. बसने पाहता-पाहता पेट घेतला. हा थरारक प्रकार शहारातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज(दि.20) रात्री 9:28 च्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. सुदैवाने बस वाहक व चालकाने गाडी वेळीच थांबवीली आणि पटापटा आतील प्रवासी खाली उतरविले, त्यामुळे कोणाच्या जीवताला धोका झाला नाही.
बीड जिल्ह्यातील परळीत प्रवाशांनी भरलेल्या ST महामंडळाच्या बसने घेतला पेट pic.twitter.com/O5pGTe1GgY
— Lokmat (@lokmat) October 20, 2023
बसने पेट घेतला त्यावेळी 20 प्रवासी होते, हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र MH 06 BW 0913 नंबरची परभणी आगाराची एसटी बस जळून खाक झाली आहे. रात्री 10 च्या सुमारास थर्मल व नगरपालिकेच्या आग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नागरिकां मोठी गर्दी केली होती.