चार वर्षीय बालकाचा खून, पोलिसांनी मामाला घेतले ताब्यात; परळीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 18:11 IST2022-09-11T16:11:31+5:302022-09-11T18:11:05+5:30
परळी तालुक्यातील नागापूर येथे चार वर्षीय बालकाचा सख्या मामाने खून केल्याची घटना घडली आहे.

चार वर्षीय बालकाचा खून, पोलिसांनी मामाला घेतले ताब्यात; परळीतील धक्कादायक घटना
परळी: परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे मामाच्या गावी आलेल्या चार वार्षिय बालकाच्या मानेवर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे. बालकाचे नाव कार्तिक विकास करंजकर(युसुफवड गाव ता. केज) असे आहे. कार्तिक हा आपल्या आईसोबत नागापूर कॅम्प येथे (दि. 10 रोजी) मामाच्या गावी आला होता.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर व परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान या खुनाच्या घटनेमुळे नागापूर परिसर हादरून गेला आहे. या खुनाप्रकरणी बालकाचा मामा शहाणीक लक्ष्मण चिमणकर(वय 27) याला परळी ग्रामीण पोलीसानी ताब्यात घेतले आहे. परळी ग्रामीणचे पीएसआय पोळ हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.