घर नावावर करण्यास नकार दिल्याने मुलाकडून आईचा खून, परळीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:59 IST2025-09-21T13:58:59+5:302025-09-21T13:59:36+5:30

आईच्या डोक्यात कुरुंदाचा दगड मारुन हत्या.

Mother murdered by son for not registering house in his name, shocking incident in Parli | घर नावावर करण्यास नकार दिल्याने मुलाकडून आईचा खून, परळीतील धक्कादायक घटना

घर नावावर करण्यास नकार दिल्याने मुलाकडून आईचा खून, परळीतील धक्कादायक घटना

परळी: तालुक्यातील भोजनकवाडी येथे  काल(२० सप्टेंबर रोजी) रात्री ९.३० वाजता घर नावावर करुन न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं?

मृत महिला सुनंदा ज्ञानोबा कांगणे (वय ४५, रा. भोजनकवाडी) यांच्या नावावर असलेल्या घरावरुन वारंवार वाद होत होता. घर नावे करुन देण्यास आईने नकार दिल्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत ज्ञानोबा कांगणे (वय २८) याने आईच्या डोक्यात कुरुंदाचा दगड घातला. यात सुनंदा कांगणे यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची धाव

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मजहर सय्यद, उपनिरीक्षक शेख यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

आरोपी ताब्यात

या प्रकरणी उमाकांत रमेश केदार (रा. भोजनकवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी आरोपी चंद्रकांत कांगणे याला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Mother murdered by son for not registering house in his name, shocking incident in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.