भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 16:05 IST2022-07-17T16:04:53+5:302022-07-17T16:05:07+5:30

'संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला', या अभंगवणीचा प्रत्यय आला - धनंजय मुंडे

Mahant Namdev Shastri of Bhagwangad visited the residence of Dhananjay Munde for blessings | भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट

परळी- भगवानगडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आणि परळीचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मुंडेंच्या परळी येथील पंढरी या निवासस्थानी आशीर्वादपर सदिच्छा भेट दिली. 

यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी नुकताच पार पडलेल्या धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त मुंडे यांना संत भगवानबाबा यांची भव्य प्रतिमा भेट देऊन आशीर्वाद दिला. याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणीबाई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, प्रा. निलेश आघाव आदी उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी देखील मुंडे कुटुंबाच्या वतीने महंत नामदेव शास्त्री यांचे स्वागत करत आशीर्वाद घेतले. आज सकाळीच संतांचे दर्शन थेट घरी लाभले, संतांच्या सान्निध्यात ईश्वर प्राप्ती होते, असा आशय सांगणाऱ्या 'संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला...' या अभंगवणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Mahant Namdev Shastri of Bhagwangad visited the residence of Dhananjay Munde for blessings