घोड्यावर आला अन् मतदानाचा हक्क बजावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:36 IST2019-04-19T00:35:29+5:302019-04-19T00:36:37+5:30
तालुक्यातील बोबडेवाडी येथील हनुमान वस्तीवर राहत असलेल्या प्रकाश कोठुळे नामक मतदाराने घोड्यावर स्वार होत अडीच किलोमीटर अंतर कापले आणि बोबडेवाडी येथील केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावला.

घोड्यावर आला अन् मतदानाचा हक्क बजावला
दीपक नाईकवाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील बोबडेवाडी येथील हनुमान वस्तीवर राहत असलेल्या प्रकाश कोठुळे नामक मतदाराने घोड्यावर स्वार होत अडीच किलोमीटर अंतर कापले आणि बोबडेवाडी येथील केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावला.
शेतात काम करताना प्रकाश कोठुळे यांच्या पायास मार लागला होता. त्यामुळे त्यांना चालताना त्रास होतो. त्यातच गुरु वारी बीड लोकसभा निवडणुकीचे मतदान करण्यासाठी आपणास कोणी घेऊन जाईल, वाहन पाठविल याची वाट न पाहता स्वत:च्या घोड्यावर बसून हनुमान वस्तीपासून मतदान केंद्र गाठले. मतदानाला जाण्यासाठी निरुत्साह दाखविणाऱ्या मतदारांना प्रकाशने लोकशाहीतील आपला हक्क बजावण्याचा संदेश स्वत:च्या कृतीतून दाखविला. मतदानानंतर प्रकाशने पुन्हा घोड्यावर स्वार होत वस्तीकडे प्रस्थान केले.