डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:35 IST2025-05-04T12:35:02+5:302025-05-04T12:35:31+5:30

याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

Father kills son by hitting him in the head with an axe, shocking incident in Majalgaon | डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना

डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना

पुरूषोत्तम करवा/ माजलगाव: बीड जिल्ह्यातील माजलगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या खानापूर येथील  गोपाळ कांबळे नावाच्या व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलाच्या डोक्यात कुराडीचा दांडा मारुन खून केल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रोहीत कांबळे, असे या मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर येथील गोपाळ कांबळे यांची घरगुती वादामुळे मुलाशी कुरबुर झाली होती. ही कुरबुर सुरू असताना बापाने बाजूला असलेला कुऱ्हाडीचा दांडा घेऊन मुलाच्या डोक्यात घातला. या घटनेत मुलगा रोहित जागीच मरण पावला. त्याला आजूबाजूच्या लोकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Father kills son by hitting him in the head with an axe, shocking incident in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.