बीडमध्ये कलेक्टरने मतदारांना विचारले, किसीने डराया, धमकाया तो नही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:46 IST2019-04-18T17:42:55+5:302019-04-18T17:46:44+5:30
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बीड शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

बीडमध्ये कलेक्टरने मतदारांना विचारले, किसीने डराया, धमकाया तो नही ?
बीड : किसीने डराया, धमकाया? मर्जीसे वोट कर रहे हो ना ? अशी विचारणा करत निवडणून भयमुक्त वातावरणात होत असल्याचे जाणून घेत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बीड शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
शहरातील धांडे गल्ली, मोमीनपुरा व अन्य मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी भेटी दिल्या. केंद्रांवर मतदानासाठी मतदार रांगेत उभे होते. तेथे पाहणी करुन त्यांनी मतदारांशी संवाद सुरु केला. काही जोरजबरदस्ती आहे का? कोणी धमकावलं का्य किसीने डराया धमकाया क्या? काही समस्या आहे का? फ्री और फेअर इलेक्शन हो रहा है? असे प्रश्न विचारताच मतदारांनी नाही असे उत्तर दिले.
मै खुद चेक करने आया हूं, अपनी मर्जी से वोट कर रहे है ना? कोई डरा- धमका रहा तो मुझे बताओ, असे सांगून जिल्हाधिकारी दुस-या केंद्रावर भेट देण्यासाठी जातात.
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये अधिकारी मतदान केंद्रांना भेट देतात. तेथील कर्मचा-यांना विचारतात व निघुन जातात, असा अनुभव असणा-या बीडमधील मतदारांना आस्तिककुमार पाण्डेय यांचा संवाद मात्र भावला.