Beed: मतदान पूर्वरात्री माजलगावात जीपमधून सहा लाखांची रोकड जप्त; जीप,पैसे कोणाचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:58 IST2025-12-02T11:57:40+5:302025-12-02T11:58:04+5:30
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माजलगाव येथील बायपासवर कारवाई

Beed: मतदान पूर्वरात्री माजलगावात जीपमधून सहा लाखांची रोकड जप्त; जीप,पैसे कोणाचे?
माजलगाव ( बीड) : शहरातील बायपास रोडवर सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका जीप मध्ये ठेवण्यात आलेले सहा लाख रुपये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली. हे पैसे कोणाचे याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
सोमवारी नगरपालिका-नगर परिषद प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराकडून प्रचाराचा वेग वाढला होता. संध्याकाळी साडेसात वाजता तुम्हाला बायपास रोड असलेल्या तबेल्या समोर एका जीपमध्ये पैसे वाटप केली जात असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी गौरव इंगोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी जाऊन जीपची तपासणी केली असता त्यामध्ये सहा लाख रुपये सापडले. सापडलेली रक्कम जप्त केली असून हे वाहन कोणाचे आहे? पैसे कोणाचे होते? याची चौकशी जात आहे. दरम्यान, 17 तासानंतरही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.
हिशोब मागितला
जीपमध्ये सापडलेली रक्कम जप्त केली आहे. सदरील व्यक्तीस हिशोब देण्यास सांगितले आहे.
- सुंदर बोंदर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी न.प. माजलगाव