कारमध्ये आढळली ४० लाख रूपयांची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 19:35 IST2019-04-08T19:33:22+5:302019-04-08T19:35:22+5:30
जिनिंग मालकाची रक्कम असल्याची माहिती मिळाली आहे

कारमध्ये आढळली ४० लाख रूपयांची रक्कम
बीड : बीड बसस्थानकासमोर वाहनांची तपासणी करत असताना एका कारमध्ये (एमएच २६ एके १५५६) तब्बल ४० लाख रूपयांची रक्कम सापडली. ही रक्कम निवडणुक विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. ही रक्कम जिनींग मालकाची असून त्याच्याकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बीड बसस्थानकासमोर सोमवार सायंकाळी वाहतू शाखेचे पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करीत होते. याचवेळी एका कारची तपासणी केली असता डिक्कीमध्ये बॅग आढळली. बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये रक्कम असल्याचे दिसले. वाहतूक पोलिसांनी तात्काळ ही रक्कम आणि कार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेली. पोनि शिवलाल पुर्भे यांनी तपासणी करून निवडणुक विभागाला माहिती दिली.
पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता ही रक्कम अग्रवाल नामक व्यक्तीने सोमवारी दुपारी बीडमधील एसबीआय बँकेतून काढली होती. ही रक्कम गेवराई येथील जिनींगच्या व्यवहारासाठी घेऊन जात होते, असे सांगण्यात आले. सध्या ही रक्कम निवडणुक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिवाजीनगर ठाण्यात या घटनेचा अहवाल वाहतूक पोलिसांनी दिल्याचे पोनि पुर्भे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.