मतदानात गैरप्रकार रोखणार, महापालिका हद्दीत 'चप्पे चप्पे पे' पोलिस तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:43 IST2026-01-15T15:42:48+5:302026-01-15T15:43:38+5:30
Amravati : महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊ घातले आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात शहर पोलिस दलाचे सुमारे १७०० अधिकारी, कर्मचारी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी 'ऑन रोड' राहणार आहेत.

To prevent irregularities in voting, 'Chappe Chappe Pe' police deployed in municipal limits
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊ घातले आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात शहर पोलिस दलाचे सुमारे १७०० अधिकारी, कर्मचारी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी 'ऑन रोड' राहणार आहेत.
निवडणुकीसाठी पोलिस खात्याची तयारी
शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी भक्कम पूर्वतयारी करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून पोलिसांनी ती पूर्वतयारी हाती घेतली होती.
१३२ अधिकारी, १६५० - पोलिस कर्मचारी
महापालिका निवडणुकीसाठी शहर आयुक्तालयातील १३२ पोलिस अधिकारी व १६५० पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्यातील पोलिस अंमलदार बुधवारीच मतदान केंद्रावरदेखील पोहोचले आहेत.
१६ तपासणी पथकातही पोलिस कर्मचारी
महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी व गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची आठ व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची आठ स्पेशल पेट्रोलिंग पथकेदेखील नेमण्यात आली आहेत.
काही उपद्रवी शहराबाहेर
आयुक्तालयाने काही उपद्रवींना मतदानापुरते शहराबाहेर पाठविले आहे. तर मतदानाच्या पार्श्वभूमिवर ७३७ जणांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ती कारवाई निरंतर सुरू असेल.