स्त्रीवर्गाचा नेतृत्व गुणविकास, शांती राजदूत बनून ‘कृषीकन्या' इंग्लंडला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 21:55 IST2019-07-19T21:55:14+5:302019-07-19T21:55:51+5:30
राज्यात २४ विद्यार्थिनींची निवड : १२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उपक्रम

स्त्रीवर्गाचा नेतृत्व गुणविकास, शांती राजदूत बनून ‘कृषीकन्या' इंग्लंडला जाणार
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न अमरावती येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या जागृती गावंडे आणि मयूरी महाकाळकर या दोन विद्यार्थिनींची इंग्लंड येथे शांती राजदूत म्हणून निवड झालेली आहे. लीला पूनावाला फाऊंडेशनच्या या उपक्रमात त्यांना १२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर असे तीन आठवडे इंग्लंड येथे वास्तव्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रातून २४ विद्यार्थिनींची निवड झालेली आहे. स्त्रीवर्गातील युवा नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, आपल्या या गुणांचा विकास करून आपण ज्या समाजात राहतो, त्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने त्यांची जडणघडण व्हावी, हा दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. या दोन्ही विद्यार्थिनींच्या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, रामचंद्र शेळके, गजानन फुंडकर, दिलीप इंगोले, कार्यकारीणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोक ठुसे, प्राचार्य शशांक देशमुख, लीला पुनावाला फाऊंडेशनच्या समन्वयक सुप्रिया बेजलवार यांनी कौतुक केले.