उमेदवार मनपाचा कंत्राटदार नसावा; स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:25 IST2025-12-30T14:25:00+5:302025-12-30T14:25:48+5:30
Amravati : अर्ज दाखल करताना ५०० शब्दांपर्यंत विकासाचे व्हिजन द्यावे लागणार

Candidate should not be a contractor of the Municipal Corporation; will have to submit a self-declaration form
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अनधिकृत बांधकाम केलेले नाही तसेच निवडून आल्यानंतर मी किंवा माझे कुटुंबीय भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार नाही. तसेच मी किंवा माझे कुटुंबीय महापालिकेचा कोणतेही कंत्राट घेणार नाही. याबाबतची माहिती महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांना द्यावी लागणार आहे.
महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने कठोर नियम बनविले. शपथपत्राचाही या नियमांमध्ये समावेश आवश्यक कागदपत्रांसह जबाबदारीच्या आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर उमेदवारांना दिलेल्या शपथपत्राप्रमाणे महापालिकेचा कारभार करावा लागणार आहे. उमेदवार महापालिकेचा कंत्राटदार नसावा व त्याच्याकडे महापालिकेची कुठलीच थकबाकी नसावी, याबाबतची माहिती त्यांना द्यावी लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम निर्णय घेतील.
खर्चाचा हिशोब ३० दिवसात देणार असे हमीपत्र
उमेदवाराद्वारा निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल लागल्याचे ३० दिवसांच्या आत सादर न केल्यास मी अनर्ह ठरेल, याबाबतचे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे.
दोनपेक्षा अधिक अपत्य, तर अपात्र
१२ सप्टेंबर २००१ नंतर झालेल्या अपत्यामुळे एकूण अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक होत असल्यास, ती व्यक्ती महापालिकेची निवडणूक लढण्यास अपात्र ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अपत्यांबाबत शपथपत्र सादर करावे लागणार आहे.
हे हमीपत्र / घोषणापत्र/स्वयंघोषणापत्र आवश्यक
उमेदवारांना अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र, अपत्याबाबतचे हमीपत्र, शौचालय वापराबाबतचे स्वयंघोषणापत्र, निवडणूक खर्चाचे हमीपत्र, नमुना स्वाक्षरी सादर करणे अनिवार्य आहे.
माहिती लपवल्यास कारवाई होणार
उमेदवारांनी अर्ज भरताना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आवश्यक असलेली माहिती चुकीची दिली तर सदर उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
उमेदवारी अर्जासाठी कठोर नियम
उमेदवारांसाठी यावेळी कठोर नियम आहेत. अर्जासोबत काय काय माहिती सादर करावी लागते, याची माहिती आरओ यांच्या कार्यालयातील कक्षात उमेदवारांना पुरविली जात आहे.
विकास योजनांचीही माहिती द्यावी लागणार
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना अर्जासोबत शहर विकासासंबंधीची माहिती सादर करावी लागणार आहे. १०० ते ५०० शब्दमर्यादेत निवडून आल्यानंतर प्रभागात कोणत्या विकास योजना
"उमेदवार हा कंत्राटदार नसावा, शिवाय निवडून आल्यास विकासासाठी काय करणार याबाबत १०० ते ५०० शब्दांपर्यंत माहिती द्यावी लागेल."
- विजय लोखंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी