अमरावतीत भाजपच्या निवडणुकीतील पराभवाचे सखोल विश्लेषण होणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:18 IST2026-01-19T17:16:57+5:302026-01-19T17:18:00+5:30

Amravati : बावनकुळे यांनी ५५ प्लसचा नारा दिला होता. प्रत्यक्षात भाजप ४५ हून २५ पर्यंत खाली घसरली.

BJP's defeat in Amravati election will be analyzed in depth: Revenue Minister Chandrashekhar Bawankule | अमरावतीत भाजपच्या निवडणुकीतील पराभवाचे सखोल विश्लेषण होणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

BJP's defeat in Amravati election will be analyzed in depth: Revenue Minister Chandrashekhar Bawankule

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
अमरावती महापालिका निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण सखोल करणे आवश्यक असून, पराभूत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाईल. यासाठी अमरावती येथे विशेष चौकशी टीम पाठविण्यात येणार असून, कोणी विरोधात काम केले, याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नागपूर येथील जिल्हा नियोजन भवनात रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमरावतीतील निवडणूक पराभव, महापौरपदाचा कालावधी, युतीचे राजकारण तसेच विरोधकांच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली.

अमरावतीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीत नेमके काय घडले, कोणी पक्षविरोधी काम केले का, याची चौकशी केली जाईल. तक्रारी प्राप्त झाल्या पराभूत उमेदवारांकडून असून, त्याची दखल अमरावतीला पाठवली जाणार आहे. घेण्यासाठी विशेष टीम अमरावतीत मित्र पक्षाच्या सहकार्याने महापौर भाजपाच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपजनांचे त्या टिमकडे लक्ष लागले आहे.

Web Title : अमरावती में भाजपा की चुनावी हार का होगा गहरा विश्लेषण: चंद्रशेखर बावनकुले

Web Summary : मंत्री बावनकुले ने अमरावती में नगरपालिका चुनाव में हार की जांच के लिए एक विशेष टीम की घोषणा की। पराजित उम्मीदवारों की शिकायतों का समाधान किया जाएगा। टीम दल-विरोधी गतिविधियों की जांच करेगी, सहयोगियों के साथ भाजपा की महापौर पद सुनिश्चित करेगी।

Web Title : Amravati BJP's election defeat to be analyzed deeply: Chandrashekhar Bawankule.

Web Summary : Minister Bawankule announced a special team to investigate Amravati's municipal election defeat. Complaints from defeated candidates will be addressed. The team will probe anti-party activities, ensuring BJP's mayoral position with allies.