अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 26, 2024 13:50 IST2024-04-26T13:48:56+5:302024-04-26T13:50:26+5:30
अनेक केंद्रांवर रांगा : नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह

Amravati Polling Booth
अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान झाले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी वाढण्याची शक्यता आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये बडनेरा मतदारसंघात ३०.५७ अमरावती ३२.३१, तिवसा २८.३०, दर्यापूर २५.८८, मेळघाट ३५.३० व अचलपूर विधानसभा मतदारसंघात ३६.३५ टक्के मतदान झाले आहे. अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा आहेत. नागरिक उस्फूर्तपणे मतदानात सहभागी होत आहे. विशेष म्हणजे अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील अनेक केंद्रांत रांगा असल्याने यावेळी रांगाविरहीत मतदान, ही निवडणूक विभागाची संकल्पना अपयशी ठरली आहे.