अमरावती लोकसभा; सकाळी ११ पर्यंत १८ टक्के मतदान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 26, 2024 12:18 IST2024-04-26T12:15:20+5:302024-04-26T12:18:39+5:30

उन्हामुळे नागरिकांनी सकाळच्या टप्प्यात गर्दी : अनेक केंद्रांवर रांगा

Amravati Lok Sabha; 18 percent polling till 11 am | अमरावती लोकसभा; सकाळी ११ पर्यंत १८ टक्के मतदान

Polling at Amravati

अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी ११ पर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी वाढण्याची शक्यता आहे.


 अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये बडनेरा मतदारसंघात १८.७५ अमरावती १९.९१, तिवसा १६.१०, दर्यापूर १७, मेळघाट १२.६० व अचलपूर विधानसभा मतदारसंघात २१.४६ टक्के मतदान जाले आहे. यामध्ये ३,२५,५०७ मतदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण १८,३६,०७८ मतदार आहेत.

Web Title: Amravati Lok Sabha; 18 percent polling till 11 am