कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:53 IST2026-01-09T17:52:29+5:302026-01-09T17:53:33+5:30
Akola Muncipal Election 2026 Eknath Shinde: अकोला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढला आहे. मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सभेची मागणी होत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणाचीही चर्चा आहे.

कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?
Akola Municipal Election 2026: पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी दुपारी शहरातील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रंगलेल्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचे वारे सुरू झाले. शिंदेंनी सभेत जोशपूर्ण भाषण करून पक्षासाठी त्याग करणाऱ्या शहरप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांचे कौतुक केले.
भविष्यात पक्ष त्यांची दखल नक्कीच घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले, पण सभास्थळीच कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काही पदाधिकारी असूनही त्यांचे तिकीट कापले गेले होते; पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला आहे. शिंदेंनी माघार घेणाऱ्यांचे कौतुक केले असले तरी, कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.
शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! शिंदेसेनेत अंतर्गत गटबाजी असूनही, काही पदाधिकारी टिकू दिले जातील की त्यांच्या त्यागाचे फळ त्यांना दिले जाईल, यावरच सध्या चर्चा होत आहे. सध्याच्या परिस्थितीत माघार घेणाऱ्यांचा संघर्ष आणि त्यांचा त्याग कितपत फळणार आहे, हे पुढील काळच ठरवेल.
प्रचाराला भाऊ आणि दादा दोघेही पाहिजेतच !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६० प्लस जागा निवडून आणण्याचे वचन भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे यांनी दिले आहे. हे दोघे शहरातील भाजप उमेदवारांसाठी स्टार प्रचारक आहेत.
प्रभागात दोघांचाही दौरा होण्यासाठी उमेदवारांसोबतच कार्यकर्त्यांचाही आग्रह होत आहे. या दोघांनीही जगन्नाथाचा रथ खांद्यावर घेतला असून, शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांसाठी पदयात्रा, कॉर्नर सभा घेताना दिसत आहेत.
प्रचाराचा झंझावात, त्यांनी सुरू केला असून, अनेक ठिकाणी आमदार रणधीर सावरकर, खासदार धोत्रे सातत्याने पदयात्रा करताना दिसत आहेत. त्यामुळे आमच्या पदरात यश पडणार, असा आशावाद कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
आमच्या प्रभागात प्रचाराला भाऊ आणि दादा दोघेही पाहिजेतच, अशी अपेक्षा उमेदवारांकडून होत आहे. काहीही करा, आमच्या प्रभागात प्रचारासाठी वेळ काढा, असा आग्रह कार्यकर्ते करताना दिसत आहेत.