अकोला महापालिका महापौरपदासाठी तीन तर उपमहापौरसाठी चार जणांचे अर्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 21:25 IST2026-01-28T21:24:34+5:302026-01-28T21:25:40+5:30
महापौरपदासाठी भाजपच्या दोन व उद्धवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. दोन्ही पदांची निवड प्रक्रिया ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत होणार आहे.

अकोला महापालिका महापौरपदासाठी तीन तर उपमहापौरसाठी चार जणांचे अर्ज!
अकोला महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी अनुक्रमे तीन उमेदवारांनी पाच, चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये महापौरपदासाठी भाजपच्या दोन व उद्धवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून दोन, एक काँग्रेस, एक अपक्ष उमेदवाराचा अर्ज सोमवारी दाखल झाला.
दोन्ही पदांची निवड प्रक्रिया ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत होणार आहे. २५ जानेवारी रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी एकूण ४६ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले होते. २६ जानेवारी रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले.
महापौरपदासाठी एकूण ३ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. यामध्ये भाजपकडून शारदा रणजित खेडकर यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांना सूचक म्हणून सुनीता विजय अग्रवाल व विजय कमलकिशोर अग्रवाल तर अनुमोदक म्हणून वैशाली विलास शेळके व जयंत रामराव मसने यांची नावे आहेत.
अॅड. कल्पना संजय गोटफोडे यांचा अर्ज सूचक योगिता गणेश पावसाळे व अनुमोदक संतोष देवराव डोंगरे यांनी समर्थित केला आहे. तसेच उद्धवसेनेच्या सुरेखा मंगेश काळे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांना काँग्रेसच्या निलोफर खान, उद्धवसेनेच्या सोनाली दिनेश सरोदे हे सूचक तर वंचित बहुजन आघाडीचे नीलेश देव, उद्धवसेनेचे मनोज पाटील अनुमोदक आहेत.
सभेच्या दिवशी छाननी
उपमहापौरपदासाठी ४ १ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन अर्ज सादर केले. भाजपचे अमोल सुधाकर गोगे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांना प्रशांत गोविंदराव जोशी व मंजुषा संजय शेळके सूचक, तर सिद्धार्थ रामदास उपरवट व आरती प्रकाश घोगलिया अनुमोदक आहेत.
२ तर भाजपचेच अमोल 3 अवधूत मोहोकार यांना सूचक म्हणून नितीन ताकवाले, अनुमोदक म्हणून पवन महल्ले यांच्या स्वाक्षरी आहेत. काँग्रेसचे आझाद खान अलीयार खान आणि अपक्ष आशिष गणेशराव पवित्रकार यांच्या अर्जावर सूचक विजय इंगळे, अनुमोदक अभय खुमकर आहेत. नामनिर्देशन छाननी व पुढील निवड प्रक्रिया शुक्रवारी नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.