अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ
By Atul.jaiswal | Updated: June 21, 2023 14:27 IST2023-06-21T14:26:44+5:302023-06-21T14:27:13+5:30
दक्षिण मध्य रेल्वेने आठवड्यातून एकदा चालविण्यात येणाऱ्या या गाडीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ
अकोला :हैदराबाद ते गुलाबी शहर जयपूर दरम्यान अकोला-वाशिम मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर-हैदराबाद विशेष गाडीला मिळणारा प्रतीसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने आठवड्यातून एकदा चालविण्यात येणाऱ्या या गाडीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनूसार, गाडी क्र. ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष गाडी ७ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधित दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर शनिवारी सकाळी ५:४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७११६ जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी ९ जुलै ते २७ ऑगस्ट या कालावधित दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर सोमवारी दुपारी ३:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा आठ-आठ फेऱ्या होणार आहेत.