अकोला पूर्व मतदार संघामध्ये सावरकरांनी रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:42 IST2024-11-23T14:41:56+5:302024-11-23T14:42:50+5:30
Akola Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate BJP Randhir Savarkar : हॅट्रिक साधत बाजी मारली, तब्बल पन्नास हजार मतांनी विजय

History made by Savarkar in Akola East Constituency
अकोला : अकोला पूर्व मतदार संघामध्ये २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपचे रणधीर सावरकर यांनी हॅट्रिक नोंदवीत इतिहास रचला आहे.
अकोला मतदारसंघांमध्ये गद्दा वर्षांपासून रणधीर सावरकर हे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी केलेली मतदार संघाची बांधणी आणि विकास कामे, लाडक्या बहिणींचा मिळालेला आशीर्वाद या बळावर तब्बल एक लाख ७२६७ असे विक्रमी मतदान घेत, तब्बल ५०६१३ मतांनी विजय प्राप्त केला आहे. हा विजय त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला असून, यापुढेही मतदारसंघाच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचे रणधीर सावरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.