बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:53 IST2025-12-30T12:51:52+5:302025-12-30T12:53:38+5:30
Akola Municipal Election: अकोला महापालिका निवडणुकीसाठी बच्चू कडू यांच्या प्रहारने उद्धवसेनेसोबत युती केली आहे.

बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
Akola Municipal election: अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला असून, प्रहार जनशक्ती पक्ष आणि उद्धवसेनेत सोमवारी युती झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अकोल्यातील नव्या युतीनुसार प्रहार संघटनेचे चार उमेदवार उद्धवसेनेच्या 'मशाल' या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. प्रहारचे तीनही उमेदवार प्रभाग क्रमांक ८ मधून मशाल चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या युतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, उद्धवसेनेकडून अकोल्यात संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हा डाव टाकण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
याआधीच उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीची घोषणा करून राजकीय चर्चाना उधाण आणले होते. त्यातच आता बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष उद्धवसेनेसोबत आला आहे. अकोल्यात ही युती कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.