Akola Lok Sabha Results 2024 : 16 हजारांची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला
By नितिन गव्हाळे | Updated: June 4, 2024 14:55 IST2024-06-04T14:54:31+5:302024-06-04T14:55:39+5:30
Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचा आनंद ठरला, औटघटकेचा; काट्याच्या लढतीत प्रथमच अप-डाऊनचा लपंडाव

Dhotre Getting a lead of 16,000 led to enthusiasm among the BJP workers
नितीन गव्हाळे, अकोला
Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघातील मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या पंधराव्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांनी 16 हजार मतांचा लीड मिळवला होता. परंतु त्यांचा लीड कापण्यात भाजपचे अनुप धोत्रे यशस्वी झाले असून आता त्यांनी त्यांच्यावर अठराव्या फेरी अखेर 17 हजार 277 मतांची आघाडी मिळवली आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासून ते पंधराव्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे अभय पाटील हे आघाडीवर होते. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. आपल्या उमेदवाराचं आता कसं उमेदवार निवडून येतो की नाही याची धातू भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुरू झाली होती. परंतु सोळाव्या फेरीपासून शहरातील मतांचा गठ्ठा निघाल्यामुळे मतमोजणी 16 व्या फेरी पासून भाजपचे अनुभवते यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली.
आता त्यांची ही आघाडी 17 हजार 277 मतांवर पोहोचली आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. आता आपला विजय जवळ आहे असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी जल्लोष सुरू केला आहे तर काँग्रेसच्या खेळण्यात शांतता पसरली असून काँग्रेस उमेदवारासह कार्यकर्त्यांना पुन्हा आघाडी मिळवण्याची अपेक्षा आहे.