अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: बारावी फेरी : भाजपाचे डॉ.सुजय विखे यांची १ लाख ३९ हजार मतांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:48 PM2019-05-23T12:48:17+5:302019-05-23T12:52:27+5:30

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

twelve round : Ahmednagar Lok Sabha Election 2019 live result & winner: Sujay Vikhe VS Sangram Jagtap Votes & Results | अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: बारावी फेरी : भाजपाचे डॉ.सुजय विखे यांची १ लाख ३९ हजार मतांची आघाडी

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: बारावी फेरी : भाजपाचे डॉ.सुजय विखे यांची १ लाख ३९ हजार मतांची आघाडी

Next

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात मुख्य लढत होत आहे. सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच ठेवली असून बाराव्या फेरीअखेर १ लाख हजार ३९ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली. अकराव्या फेरीअखेर डॉ.सुजय विखे यांना ३ लाख १४ हजार ७४० हजार तर आमदार संग्राम जगताप यांना १ लाख ९० हजार ४३८ मते मिळाली आहे. अकराव्या फेरीअखेर एकूण ५ लाख ३९ हजार ७४३ एवढ्या मतांची मोजणी झाली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.२६ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना ६ लाख ३ हजार ९७६ मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना ३ लाख ९५ हजार ५६९ मतं मिळाली होती.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले.
 

 

Web Title: twelve round : Ahmednagar Lok Sabha Election 2019 live result & winner: Sujay Vikhe VS Sangram Jagtap Votes & Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.