राधाकृष्ण विखेंवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:59 IST2019-04-08T17:57:40+5:302019-04-08T17:59:33+5:30
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत.

राधाकृष्ण विखेंवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी
अहमदनगर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करणार की नाही? असा प्रश्न राष्टÑवादीने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना केला आहे. विखेंवर कारवाई करा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
राष्टÑवादीचे नगर जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे यांनी चव्हाण यांच्याकडे ही तक्रार केली आहे.नगर मतदारसंघात सुजय विखे हे भाजपकडून उमेदवारी करत आहेत. राधाकृष्ण विखे यांचे ते पूत्र आहेत. नगर मतदारसंघात युतीचा उमेदवार निवडून येईल असे विखे हे माध्यमांसमोर उघडपणे सांगतात. तसेच ते डॉ. सुजय यांचा प्रचारही करत आहेत याकडे लक्ष वेधत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.