Viral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:28 PM2018-09-25T17:28:39+5:302018-09-26T08:00:00+5:30

नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत विवेक पत्नी दिव्यांकासह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. 

Viral: Divyanka Tripathi Shares A Romantic Pic From Maldives | Viral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

Viral: दिव्यांका त्रिपाठीसह विवेक दहियाने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

googlenewsNext


टीव्ही कपलमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे सगळ्यांचे फेव्हरेट असून आणि रोमँटीक कपल आहे. त्यांच्या विषयी छोट्यातली छोटी गोष्टी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. या दोघांचा एक रोमँटीक फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून लव इज द एअर असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. नुकतेच हे दोघे मालदीवला व्हॅकेशनसाठी गेले होते. दोघांनी  एकत्र वेळ घालवत  सुट्ट्यांचा मस्त आनंद लुटला. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहे. हा फोटो शेअर होताच तिच्या या फोटोला अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढत विवेक पत्नी दिव्यांकासह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. 

 

'ये है मोहब्बते' मालिकेतून दिव्यांका इशिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती लोकप्रिय झाली आहे. शिवाय तिला चाहत्यांचे भरभरून प्रेमही मिळाले आहे. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ही मालिका जरी संपली तरीदेखील दिव्यांका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

छोट्या पडद्यावर लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या एकता कपूरच्या आगामी एका वेबसीरिजमध्ये दिव्यांका त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव शेफ असे असून यात दिव्यांका एका शेफच्या भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजचे चित्रीकरण सुरु झाले आहे. मात्र अद्याप एकताने या सीरिजची घोषणा अधिकृतरित्या केलेली नाही.मात्र एकता कपूरने सोशल मीडियावर ट्विट केले की, ठीक आहे. लोकांना याबद्दल समजले आहे. दोन शेफ एकमेकांच्या प्रेमात पडतात व प्रेमात धोका मिळतो. त्यानंतर दुखावलेले हे शेफ खाण्यावर प्रेम करू लागतात. जास्त प्रेमकथा या किचनमध्ये संपतात पण इथे किचनमधूनच प्रेमकथा सुरू होते.
 

Web Title: Viral: Divyanka Tripathi Shares A Romantic Pic From Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.