सलमान खान आणि कमल हासन या मंचावर येणार एकत्र, पहिल्यांदाच करणार एकत्र काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:35 PM2018-07-13T12:35:42+5:302018-07-13T12:38:13+5:30

सलमान खान आणि कमल हासन हे दोघेही अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात असले तरी त्या दोघांनी कधीच एकत्र काम केलेले नाही. पण पहिल्यांदाच त्या एका मंचावर एकत्र दिसणार आहेत.

Salman khan and kamal hassan come together for dus ka dum | सलमान खान आणि कमल हासन या मंचावर येणार एकत्र, पहिल्यांदाच करणार एकत्र काम

सलमान खान आणि कमल हासन या मंचावर येणार एकत्र, पहिल्यांदाच करणार एकत्र काम

googlenewsNext

कमल हासन यांनी अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील ते सुपरस्टार असून त्यांचा विश्वरूपम हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे ते सध्या जोरदार प्रमोशन करत आहेत. सलमान खान आणि कमल हासन हे दोघेही अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात असले तरी त्या दोघांनी कधीच एकत्र काम केलेले नाही. पण पहिल्यांदाच त्या एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. सलमान खान सध्या दस का दम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. कमल हासन दस का दम या कार्यक्रमात सहभागी होणार असून ते खेळ खेळण्यासोबतच त्यांच्या विश्वरूपम 2 या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी त्यांनी नुकतेच चित्रीकरण केले आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेला दस का दम हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करत असून त्याच्या अंदाजाने तो आपल्या चाहत्यांना प्रभावित करत आहे. दस का दम या कार्यक्रमाचा हा दुसरा सिझन असून या कार्यक्रमाचा आधीचा सिझन देखील चांगलाच हिट झाला होता. या कार्यक्रमाद्वारेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्याने बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विशेष म्हणजे सलमान हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन करत असून तामीळ बिग बॉसचे सूत्रसंचालन कमल हासन करत आहेत.  
विश्वरूपम 2 या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात कमल हासन यांच्यासोबतच पूजा कुमार, राहुल बोस आणि वहिदा रहमान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक निर्माते कमल हासन आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तामीळ भाषेत चित्रीत करण्यात आला असून तेलगू भाषेत डब करण्यात आला आहे. हा चित्रपट 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Salman khan and kamal hassan come together for dus ka dum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.