मादाम तुसादमध्ये दिलजीत दोसांझचा मेणाचा पुतळा, सोशल मीडियावर मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:20 PM2019-03-29T19:20:09+5:302019-03-29T19:24:26+5:30

जगभरातील प्रसिद्ध वॅक्स आकर्षण असणारे मादाम तुसादने नुकतेच पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे.

दिल्लीतील मादाम तुसादमध्ये हा दिलजीतचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे.

दिलजीत दोसांझचे भारतात खूप चाहते आहे. दिल्लीतील मादाम तुसादमध्ये भारत व जगभरातील प्रसिद्ध कलाकारांचे मेणाचे पुतळे आहेत. त्याचा मेणाचा पुतळा म्युझिक झोनमध्ये ठेवण्यात आला आहे.

दिलजीतने उडता पंजाब, फिलौरी व सूरमा यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

दिलजीतने बऱ्याच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे.

मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा लाँच करण्यात आल्यामुळे दिलजीत दोसांझ खूप खूश आहे