PICS : ‘भारत’चा टीजर अन् सलमान खानचे पाच लूक, पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:42 PM2019-01-25T13:42:52+5:302019-01-25T13:49:42+5:30

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘भारत’ या आगामी चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. या टीजरची खास बात म्हणजे, पाच वेगवेगळ्या लूकमधील सलमान. होय, या टीजरमध्ये सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतो आहे.

सलमानच्या दमदार आवाजाने टीजरची सुरुवात होते आणि पुढे सलमानची एक एक फ्रेम समोर येते.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या सीनने टीजरची सुरुवात होते. एका लूकमध्ये सलमान रॉकस्टारच्या भूमिकेत दिसतो.

एका लूकमध्ये नौदलाच्या पोशाखात दिसतो.

एका लूकमध्ये तो एका प्रौढ व्यक्तिच्या भूमिकेत दिसतो.

एका लूकमध्ये सलमानच्या डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यांत राग दिसतो.

एका लूकमध्ये तो मध्यम वयाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो.