"हा सगळा राजकीय खेळ..."; प्रज्ज्वल रेवन्ना अश्लील व्हिडीओ प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 08:57 AM2024-05-07T08:57:37+5:302024-05-07T09:01:45+5:30

PM Modi on Prajwal Revanna Case : प्रज्जव रेवन्ना प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Prime Minister Modi commented on the Prajwal Revanna Obscene Video Case for the first time | "हा सगळा राजकीय खेळ..."; प्रज्ज्वल रेवन्ना अश्लील व्हिडीओ प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे भाष्य

"हा सगळा राजकीय खेळ..."; प्रज्ज्वल रेवन्ना अश्लील व्हिडीओ प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे भाष्य

Prajwal Revanna Obscene Video Case : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि जेडीएस नेते प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या अश्लिल व्हिडीओ प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली आहे. कर्नाटकात प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल व्हिडीओ प्रकरण बाहेर आल्याने मित्रपक्ष असलेल्या भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. ऐन निवडणुकीत हे सगळं प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी जेडीएससोबत भाजपला घेरलं आहे. या सगळ्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.मित्रपक्षातील उमेदवारावर इतक्या गंभीर प्रकारचे आरोप झाल्याने पंतप्रधानांनी यावर प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाईम्सनाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध प्रश्नांना उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदींना देशभरात गाजत असलेल्या  प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल व्हिडीओ प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ज्वल रेवन्ना सारख्या व्यक्तीसाठी शून्य सहिष्णुता असली पाहिजे असे ठासून सांगितले. कर्नाटकातील काँग्रेस सरकार जेडीएसच्या खासदाराला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली. यासोबत निवडणूक संपल्यानंतर अश्लिल व्हिडीओ समोर आणले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

रेवन्ना प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. "प्रज्वल रेवण्णा सारख्या लोकांविरोधात Zero Tolerance चे धोरण अवलंबून त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. हे व्हिडीओ एका दिवसात रेकॉर्ड केले गेले नाहीत. हे व्हिडीओ रेकॉर्ड झाले, तेव्हा जेडीएसची काँग्रेसबरोबर युती होती. हे व्हिडीओ ते सत्तेत असताना गोळा करण्यात आले होते. कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर हे व्हिडीओ जाणीवपूर्वक बाहेर आणले गेले. त्याला देशाबाहेर पाठवल्यानंतर व्हिडिओ समोर आणले गेले.हे अत्यंत संशयास्पद आहे. राज्य सरकारला माहिती असती तर त्यांनी पाळत ठेवायला हवी होती आणि विमानतळावर लक्ष ठेवायला हवे होते," असे मोदी म्हणाले.

"तुम्ही याबाबतीत कही काहीही केले नाही, भारत सरकारला कळवले देखील नाही. याचा अर्थ हा राजकीय खेळ होता आणि त्यांना माहित आहे की हे व्हिडीओ ते एकत्र होते तेव्हा गोळा केले गेले होते. मात्र, हा माझा मुद्दा नाही. माझा मुद्दा असा आहे की अशा कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाऊ नये. आपल्या देशात अशाप्रकारचे गुन्हे थांबायला हवेत," असेही मोदी म्हणाले.
 

Web Title: Prime Minister Modi commented on the Prajwal Revanna Obscene Video Case for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.