मतमोजणी प्रक्रिया शांततेत पडली पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:45 AM2019-05-24T01:45:32+5:302019-05-24T01:46:25+5:30

शहरासह जिल्ह्यात मतदानप्रक्रियेसह मतमोजणीही गुरुवारी (दि.२३) शांततेत पार पडली. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस मुख्यालयस्तरावर सुक्ष्म नियोजन करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कायदासुव्यवस्था अबाधित राहिली.

 Counting of votes counted peacefully | मतमोजणी प्रक्रिया शांततेत पडली पार

मतमोजणी प्रक्रिया शांततेत पडली पार

Next

नाशिक : शहरासह जिल्ह्यात मतदानप्रक्रियेसह मतमोजणीही गुरुवारी (दि.२३) शांततेत पार पडली. शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस मुख्यालयस्तरावर सुक्ष्म नियोजन करत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कायदासुव्यवस्था अबाधित राहिली. नाशिककर जनतेने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले आहे. शहरासह जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या जवानांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या व अतिरिक्त पोलिसांचा फौजफ ाटा पहारा देत होता.
शहर व ग्रामीण भागात २९ एप्रिलरोजी लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी तीन हजारांपेक्षा अधिक पोलीसांचे बळ तैनात करण्यात आले होते. गुरुवारी शहरासह ग्रामीण भागातील मतदानाची मोजणी करण्यात आली. निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तत्पूर्वी सूक्ष्म नियोजन करत सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस आपापल्या हद्दीत तैनात केले होते.
गुरुवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होऊन रात्री उशिरापर्यंत शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निकाल स्पष्ट होण्याची चिन्हे दिसताच उमेदवार व कार्यकर्ते केंद्रातून बाहेर पडले. रात्री उशिरा बारा वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
संवेदनशील भागावर नजर
पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना ‘अ‍ॅलर्ट’देत नांगरे-पाटील यांनी सराईत गुन्हेगारांची धरपकड करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरात सर्वत्र चोख बंदोबस्तात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. तसेच शहरातील पंचवटी, भद्रकाली, अंबड, सातपूर, नाशिकरोड, इंदिरानगर यांसारख्या पोलीस ठाणेहद्दीतील संवेदनशाील भागावर पोलिसांची विशेष नजर होती.

Web Title:  Counting of votes counted peacefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.