माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 09:04 PM2024-03-31T21:04:11+5:302024-03-31T21:06:28+5:30

११ उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली असून त्यात विविध जातीधर्मातील लोकांना स्थान देण्यात आले आहे.

Loksabha Election 2024: Second list of candidates of Vanchit Bahujan Aghadi for 11 constituencies announced including Madha, Satara, Solapur | माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

मुंबई - VBA Second list for LS ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआपासून दूर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसऱ्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. 

हिंगोली - डॉ. बी.डी चव्हाण
लातूर - नरसिंहराव उदगीरकर
सोलापूर - राहुल काशिनाथ गायकवाड
माढा - रमेश बारस्कर
सातारा - मारुती धोंडीराम जानकर
धुळे - अब्दुल रहेमान
हातकणंगले - दादासाहेब चवगौंडा पाटील
रावेर - संजय पंडित ब्राम्हणे
जालना - प्रभाकर बकले
मुंबई उत्तर मध्य - अब्दुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - काका जोशी 

अशा ११ उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली असून त्यात विविध जातीधर्मातील लोकांना स्थान देण्यात आले आहे.

आमच्या ८ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे पडल्या

मागील निवडणुकीत आमच्या ८ जागा या काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे पडल्या, हिंदू मते मिळाली पण मुस्लीम मते काँग्रेस राष्ट्रवादीने विभागली त्यामुळे आमचा पराभव झाला. जर ही मते आम्हाला मिळाली असती तर आम्हाला ८ जागा जिंकत्या आल्या असत्या असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत केला. 

Web Title: Loksabha Election 2024: Second list of candidates of Vanchit Bahujan Aghadi for 11 constituencies announced including Madha, Satara, Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.