मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:06 PM2024-04-13T13:06:14+5:302024-04-13T13:07:47+5:30

Loksabha Election 2024: मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत टीकाकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. 

Lok Sabha Election 2024- Raj Thackeray criticizes Sanjay Raut along with Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई - Raj Thackeray on Uddhav Thackeray ( Marathi News ) गुढीपाडवा मेळाव्यात मी जी भूमिका सांगितली, यावेळी नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे. त्याचं विश्लेषण त्या सभेत केलं आहे. पहिल्या ५ वर्षातील ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याबाबतीत जो विरोध करायचा तो मी केला. २०१४ च्या अगोदरची भूमिका निवडून आल्यानंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी भूमिका बदलली जात असेल तर मलाही भूमिका बदलणं आवश्यक होते. मी टीका करताना त्या मोबदल्यात काही मागितलं नव्हते. मुख्यमंत्रिपद हवं, माझे ४० आमदार फोडले म्हणून मी टीका करत नव्हतो. मी धोरणांवर टीका केली असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीउद्धव ठाकरेंना लगावला. 

मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात राज ठाकरे म्हणाले की, पहिल्या ५ वर्षाच्या टीकेनंतर पुढच्या ५ वर्षात ज्या गोष्टी चांगल्या झाल्या त्याचे स्वागतही मी केले. कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर उभारलं गेले, खरेतर धर्माच्या आधारे आपल्याला राष्ट्र उभं करायचं नाही. परंतु १९९२ पासून २०२४ पर्यंत रखडलेली गोष्ट ज्यात आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी स्वत:ची आहुती दिली आहे. शरयू नदीत कारसेवकांची प्रेतं टाकून दिली होती. त्यांना गोळ्या झाडल्या होत्या. त्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील. इतकी वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर मोदी पंतप्रधानपदी नसते, आणि  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही मंदिर उभं राहिले नसते. ज्या गोष्टी चांगल्या असतात त्याचे कौतुक केले. एक खंबीर नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यायला हवा असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत महाराष्ट्राबाबत आमची धोरणं आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणे, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि तरुणांचे जे विषय मी मांडले. या महाराष्ट्राच्या विषयांना प्राधान्य आहे. मोदी यांनी सर्व राज्यांकडे समान अपत्यांसारखी पाहावी. गुजरात प्रिय असणं स्वाभाविक आहे कारण ते गुजराती आहेत. परंतु इतरही राज्यांकडे लक्ष दिले जाईल अशी माझी अपेक्षा आहे. मी जो पाठिंबा दिला आहे त्यावर पक्षाच्या नेत्यांशी, सरचिटणीस, महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि त्यांना सूचना दिल्या आहेत. मी सर्व गोष्टींचा विचार पक्षाचा म्हणून करत असतो, ज्यांना या गोष्टीची समज नसेल, उमजत नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा असं प्रत्युत्तर ज्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला त्यावर राज ठाकरेंनी दिले. 

दरम्यान, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष, उमेदवार यांनी मनसेच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधावा याची यादी १-२ दिवसांत आमच्याकडून दिली जाईल. आमच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मानाने वागवतील. महायुतीच्या प्रचारात पूर्णपणे सहकार्य करायचे. आमच्या कुणाशी संपर्कात साधायचे त्याबाबत २-३ दिवसांत कामाला सुरुवात होईल. माझ्या सभांबाबत अजून काही निश्चित नाही. पुढे चर्चा झाल्यावर ठरवू. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून लोकसभेकडे पाहिले जात आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं.

संजय राऊतांवर चिमटा

ज्यांना कावीळ झालीय त्यांच्यासाठी जग पिवळं दिसू शकतं, त्यामुळे संजय राऊत आत्ताच बाहेर आलेत त्यामुळे कदाचित त्यांना तसं दिसू शकते असं सांगत राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिले. 

Web Title: Lok Sabha Election 2024- Raj Thackeray criticizes Sanjay Raut along with Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.