राधे माँ ‘बिग बॉस’मध्ये?

By Admin | Published: September 2, 2015 12:20 AM2015-09-02T00:20:11+5:302015-09-02T09:16:52+5:30

सलमान खानने बिग बॉसच्या नव्या सिझनचे होस्ट होण्यास मान्यता दिल्यानंतर या रिअ‍ॅलिटी शोच्या स्पर्धकांची शोधमोहीम सुरू झाली आहे. सध्या काही नावे

Radhe mother in 'Big Boss'? | राधे माँ ‘बिग बॉस’मध्ये?

राधे माँ ‘बिग बॉस’मध्ये?

googlenewsNext

सलमान खानने बिग बॉसच्या नव्या सिझनचे होस्ट होण्यास मान्यता दिल्यानंतर या रिअ‍ॅलिटी शोच्या स्पर्धकांची शोधमोहीम सुरू झाली आहे. सध्या काही नावे ‘बिग बॉस ९’साठी चर्चेत असून शोच्या निर्मात्यांनी स्पर्धकांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात राधे माँची भेट घेण्यात आल्याची चर्चा असून जर सर्व काही ठीक झाले तर राधे माँ ‘बिग बॉस’च्या ९व्या पर्वात दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करूशकतील अशाच काही स्पर्धकांची निवड केली जाते. म्हणूनच सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राधे माँची ‘बिग बॉस’च्या आगामी सिझनसाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. राधे माँची मिनी स्कर्टमधील छायाचित्रे समोर आल्यापासून ती वादात अडकली आहे. त्यानंतर हुंड्यासाठी छळ केल्यासारखे आरोप तिच्यावर लावण्यात आले होते. बॉलीवूडमधील अनेक कलावंत राधे माँचे भक्त आहेत. यात सुभाष घई, डॉली बिंद्रा, दिव्यांका त्रिपाठी, मनोज तिवारी, प्रल्हाद कक्कड यांचा समावेश आहे.

Web Title: Radhe mother in 'Big Boss'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.