रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 12:26 IST2018-06-25T12:25:15+5:302018-06-25T12:26:03+5:30

आता त्याने त्याच्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोतील त्याची हेअरस्टाईल पासून तुम्हालाही धक्का बसेल. 

Ranveer Singh share his childhood photo, what was deepikas reaction? | रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा सोशल मीडियात चांगलाच अॅक्टीव्ह असतो. सतत आपले वेगवेगळ्या लूक्सचे फोटो तो फॅन्ससाठी शेअर करत असतो. आता त्याने त्याच्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोतील त्याची हेअरस्टाईल पासून तुम्हालाही धक्का बसेल. 

रणवीर सिंहने त्याचा 1985 मधील एक खास फोटो शेअर केला आहे. जितका अतरंगी रणवीर तुम्ही आता बघताय तो तेव्हाही तसाच होता असं या फोटोवरुन बघायला मिळतं. रणवीरचा हा फोटो पाहून त्याची गर्लफ्रेन्ड दीपिका पादुकोनने Nooo असं रिअॅक्शन दिलंय. 
त्यासोबतच अर्जून कपूरने सुद्धा 'सख्त लौंडो का उस्ताद' अशी कमेंट केली आहे. तर आयुषमान खुराणा म्हणाला की, ही हेअरस्टाईल 'विश्वात्मा' सिनेमातील गुल्शन ग्रोवरसारखी आहे. 

दरम्यान, सध्या रणवीर हा सिंबा सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तर दुसरीकडे दीपिका आणि त्याच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या आहे.

Web Title: Ranveer Singh share his childhood photo, what was deepikas reaction?