खिलाडी अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत

By Admin | Published: December 17, 2015 04:44 PM2015-12-17T16:44:30+5:302015-12-17T16:44:30+5:30

बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटात खलनायकाच्या रुपात आपणास पहावयाला मिळेल, अक्षयने आज ट्विट करुन ही माहीती दिली आहे.

Players Akshay Kumar plays villain | खिलाडी अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत

खिलाडी अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १७ - बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटात खलनायकाच्या रुपात आपणास पहावयाला मिळेल, अक्षयने आज ट्विट करुन ही माहीती दिली आहे. २०१० मध्ये रजनीकांत-एश्वर्या राय यांच्या रोबोट चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. त्यामुळे तमिळ सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी ‘रोबोट 2‘ या चित्रपटात आपणास एकत्र पहायला मिळणार आहेत.
अक्षय कुमारने आज (गुरुवार) ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली. अक्षयने एक छायाचित्र प्रसिद्ध करून आपण रोबोट २ मध्ये रजनीकांत सरांसोबत काम करत असल्याने खूप उत्साही असल्याचे म्हटले आहे. अक्षयने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात
 
त्याच्यासोबत रजनीकांत, दिग्दर्शक एस. शंकर, संगीतकार ए. आर. रेहमान हे सुद्धा आहेत. रोबोट २ या चित्रपचा तमिळ मध्ये 'एन्थीरन २.०' असे नाव आहे. चित्रपटाचे शूटींग बुधवारपासून सुरू झाले. यात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. निर्मात्याने अक्षय करीत असलेल्या भूमिकेसाठी 'द टर्मिनेटर' फेम अरनॉल्ड श्वार्झनेगरचा विचार केला होता. अखेरीस अक्षयला ही भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. अॅमी जॅक्सन यात रोबोटच्या भूमिकेत दिसेल. ए. आर. रहमान या चित्रपटाला संगीत देणार आहेत. 
बॉलिवूडचा बॉस आता तमिळ चित्रपटात पर्दापण करत आहे. अक्षयच्या चाहत्यास ही एक नविन मेजवाणी असेल, यापूर्वी बॉलिवूड मधील अजय देवगण, अमीर खान, शाहरुख खान आणि शाहिद कपूर यांना खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. तर सुपरस्टार अमिताभ यांना प्रेषकांनी नाकारले होते.
 

Web Title: Players Akshay Kumar plays villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.