Dhadak Trailer : 'धडक' सिनेमाचा झिंगाट ट्रेलर लॉन्च, बघा कसा आहे सैराटचा हिंदी रिमेक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 12:43 IST2018-06-11T12:29:03+5:302018-06-11T12:43:00+5:30
जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या बहुचर्चित धडक या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

Dhadak Trailer : 'धडक' सिनेमाचा झिंगाट ट्रेलर लॉन्च, बघा कसा आहे सैराटचा हिंदी रिमेक?
मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या बहुचर्चित धडक या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या सैराट या मराठी सिनेमाचा 'धडक' हा हिंदी रिमेक आहे. येत्या 20 जुलैला हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.
शशांक खेतान याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून या सिनेमाची निर्मिती करण जोहर याने केली आहे. सैराटप्रमाणेच या सिनेमाचं संगीतही स्टार संगीतकार जोडी अजय-अतुल यांनीच केलं आहे.
जान्हवी कपूरचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाकडे बॉलिवूडसह सर्वसामान्य प्रेक्षकांचही लक्ष लागलं आहे. जान्हवीही तिची दिवंगत आई श्रीदेवी यांच्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात घर करणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.