एकदिवसीय सामन्यात विराट कोहली स्मिथपेक्षा चांगला फलंदाज - मायकल क्लार्क

17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 07:49 PM2017-09-12T19:49:46+5:302017-09-12T19:49:46+5:30

whatsapp join usJoin us
Better than Virat Kohli Smith in ODIs - Michael Clarke | एकदिवसीय सामन्यात विराट कोहली स्मिथपेक्षा चांगला फलंदाज - मायकल क्लार्क

एकदिवसीय सामन्यात विराट कोहली स्मिथपेक्षा चांगला फलंदाज - मायकल क्लार्क

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, दि. 12 : 17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पराभवाला कधीही भीत नाही. तो विजयासाठी आक्रमकतेने संघाचं नेतृत्त्व करतो, असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने म्हटलं आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगलीचं नेतृत्त्व नेहमीच खात्रीशीर होतं. तो खऱ्या अर्थाने कौतुकाला पात्र आहे. गांगुलीने भारतीय संघात चांगलं वातावरण तयार केलं, जे महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांनी त्यांच्या पद्धतीने पुढेही कायम ठेवलं. सध्याच्या भारतीय संघात आक्रमकता आहे. विराट कोहली पराभवाला न भीता संघाचं आक्रमकपणे नेतृत्त्व करतो, असं मायकल क्लार्क म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीची तुलना कशी कराल, असाही प्रश्न मायकल क्लार्कला विचारण्यात आला. विराट कोहली उत्तम वन डे फलंदाज असल्याचं मायकल क्लार्कने मान्य केलं. विराट कोहली वन डेत निश्चितच चांगला फलंदाज आहे. मात्र दोघांमध्ये थोडंसं अंतर आहे. दोघेही चांगले खेळाडू आहेत. पण कर्धणार म्हणून तुमच्या नेतृत्त्वात संघ कशी कामगिरी करतो, ते महत्त्वाचं असतं. स्मिथला मी चांगला कसोटी फलंदाज मानतो, असं मायकल क्लार्क म्हणाला.

कोहली- स्मिथमध्ये मैत्री असण्याची गरज नाही ! - लक्ष्मण
ऑस्ट्रेलिया संघासाठी कायमच डोकेदुखी ठरलेलंय व्हीव्हीएस लक्ष्मणने दोनही संघाच्या कर्णधारांवर भाष्य करताना त्यांच्यात मैत्री असण्याचे काहीच कारण नसल्याचं सांगितलं आहे. लक्ष्मण म्हणतो, या दोन संघात होणारी मालिका ही नक्कीच जगातील सर्वात मोठे क्रिकेट युद्ध आहे. दोनही संघ चांगले क्रिकेट खेळतील. भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाला कोणतीही संधी दिली नाही. परंतु ऑस्ट्रेलियाने चांगली लढत दिली.
कोहली-स्मिथवर भाष्य करताना लक्ष्मण म्हणतो,  ते सध्याच्या काळातील दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी जागतिक क्रिकेटवर जी काही छाप सोडली आहे ती नक्कीच मोठी आहे. मैदानावर हे दोनही खेळाडू पूर्ण व्यावसायिक पद्धतीने क्रिकेट खेळतात. त्यासाठी त्यांच्यात मैत्री असावीच असे काही नाही. त्यांच्यात आक्रमकता नक्की असावी. ही एक स्पर्धा आहे आणि त्यात कोणतीही मैत्री नक्कीच नसावी. ते दोघेही चांगलेच स्पर्धात्मक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत.
कोहलीबद्दल. भारतीय कर्णधार कोहलीबद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाला, " तो एक आक्रमक कर्णधार आहे. त्याने ज्या सकारात्मक पद्धतीने संघाला पुढे नेले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. हा संघ रोज नवीन उंचीवर जात आहे आणि ते कुणाविरुद्ध खेळत आहे याचा अजिबात विचार करत नाहीत. हा संघ त्यांचे स्वतःचे लक्ष गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यात कोणतीही कमतरता दिसत नाही.

Web Title: Better than Virat Kohli Smith in ODIs - Michael Clarke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.