MI vs KXIP, IPL 2018 LIVE : मुंबईचा संघ विजयाच्या मार्गावर परतला; पंजाबवर मात

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि रोहित शर्मा व कृणाल पंड्या यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या मार्गावर परतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 07:49 PM2018-05-04T19:49:07+5:302018-05-05T02:26:23+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KXIP, IPL 2018 LIVE: Kieron Pollard dropped from Mumbai squad | MI vs KXIP, IPL 2018 LIVE : मुंबईचा संघ विजयाच्या मार्गावर परतला; पंजाबवर मात

MI vs KXIP, IPL 2018 LIVE : मुंबईचा संघ विजयाच्या मार्गावर परतला; पंजाबवर मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबईने पंजाबचे आव्हान सहा विकेट्स आणि सहा चेंडू राखून पूर्ण केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे.

मुंबईचा संघ विजयाच्या मार्गावर परतला; पंजाबवर मात

इंदूर : सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि रोहित शर्मा व कृणाल पंड्या यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या मार्गावर परतला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने ख्रिस गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर 174 धावा फटकावल्या होत्या. मुंबईने हे आव्हान सहा विकेट्स आणि सहा चेंडू राखून पूर्ण केले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे.

पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संयतपणे सुरुवात केली. सूर्यकुमारने 42 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 57 धावा करत संघाच्या विजयचा पाया रचला. त्यानंतर कृणालने 12 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 37 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. रोहितनेही विजयात हातभार लावताना 15 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 24 धावा केल्या.
होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धडाकेबाज ख्रिस गेलच्या (५०) जोरावर पंजाबने आव्हानात्मक मजल मारल्यानंतर मुंबईने सावध सुरुवात केली. एविन लेविस (१०) अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमारने मुंबईला सावरले. त्याने इशान किशनसह ४२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने शानदार अर्धशतक झळकावले. इशाननेही जबरदस्त फटकेबाजी करत १९ चेंडूत ३ षटकारांसह २५ धावा केल्या. दोघेही बाद झाल्यानंतर बढती मिळालेल्या हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह २३ धावा कुटल्या. यानंतर कर्णधार रोहित शर्मा (१२ चेंडूत नाबाद २४) आणि कृणाल पांड्या (१२ चेंडूत नाबाद ३१ धावा) यांनी तुफानी हल्ला करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुजीब उर रहमान याने २ बळी घेत चांगला मारा केला.
तत्पूर्वी, ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या आक्रमक सलामीवीरांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दमदार मजल मारली. गेलने ४० चेंडूत ६ चौकार व २ षटकात ५० धावा काढल्या. राहुलने संघाला वेगवान सुरुवात करुन देताना २० चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २४ धावा केल्या. या दोघानंतर मधली फळी कोलमडली. परंतु, करुण नायर (१२ चेंडूत २३) व मार्कस स्टोइनिस (१५ चेंडूत नाबाद २९) यांच्या जोरावर पंजाबने आव्हानात्मक मजल मारण्यात यश मिळवले.

11.34 PM : मुंबईचा पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय

11.29 PM: मुंबईला विजयासाठी 12 चेंडूंत 16 धावांची गरज

- सतराव्या षटकात रोहित आणि कृणाल पंड्या यांनी तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा लूटल्या.

11.23 PM :  मुंबईला विजयासाठी 18 चेंडूंत 36 धावांची गरज

11.11PM : मुंबईला चौथा धक्का, हार्दिक पांड्या माघारी

- पंजाबच्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव अडचणीत आला आहे. 16 व्या षटकात अॅण्ड्रयू टायने हार्दिक पांड्याचा 23 धावांवर त्रिफळा उडवत मुंबईला चौथा धक्का दिला आहे. 

11.12 PM : मुंबई 15 षटकांत 3 बाद 118

11.03 PM : मुंबईला तिसरा धक्का; इशान किशन बाद

- मुजीब उर रेहमानने इशान किशनला बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. इशानने 19 चेंडूंत 3 षटकारांच्या जोरावर 25 धावा केल्या.

10.56 PM :  सूर्यकुमार यादव OUT; मुंबईला दुसरा धक्का

- सूर्यकुमार यादवला जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. बाराव्या षटकात मार्कस स्टॉईनिसने त्याला बाद केले. सूर्यकुमारने 42 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या.

10.49 PM : सूर्यकुमार यादवला 52 धावांवर जीवदान

- आर. अश्विनच्या अकराव्या षटकात लोकेश राहुलने सूर्यकुमार यादवला यष्टीचीत करण्याची संधी गमावली. त्यावेळी सूर्यकुमार 52 धावांवर होता.

10.46 PM : चौकारासह सूर्यकुमार यादवचे अर्धशतक पूर्ण; मुंबई 1 बाद 66

- सूर्यकुमार यादवने दहाव्या षटकात एक षटकार आणि चौैकार फटकावत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

10.39 PM : मुंबई इंडियन्सचे नवव्या षटकात अर्धशतक पूर्ण

- नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने चौकार लगावत संघाचे अर्धशतक पूर्ण केले.

10.28 PM : मुंबईला पहिला धक्का, सलामीवीर इव्हिन लुईस बाद

- सहाव्या षटकात पंजाबचा फिरकीपटू मुजीब उर रेहमानने मुंबईचा सलामीवीर इव्हिन लुईसला बाद केले. लुईसला 10 धावा करता आल्या.

10.20 PM : मुंबई पाच षटकांत बिनबाद 37

- सूर्यकुमार यादव आणि इव्हिन लुईस यांनी संयतपणे मुंबईच्या डावाची सुरुवात केली. त्यामुळे मुंबईने पाच षटकांत एकही बळी न गमावता 37 धावा केल्या.

10.10 PM : सूर्यकुमार यादवचा मुंबईसाठी पहिला षटकार

- सूर्यकुमार यादवने अंकित राजपूतच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला. ़मुंबईसाठी हा पहिला षटकार होता.

गेलचे अर्धशतक; पंजाबच्या 174 धावा

इंदूर : ख्रिस गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या. गेल आणि लोकेश राहुल यांनी दमदार फलंदाजी करत 54 धावांची सालामी दिली. राहुलने 20 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 24 धावा केल्या. राहुल बाद झाल्यावही गेलने संघाचा धावपलक हलता ठेवला. गेलने 38 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण अर्धशतकानंतर गेलला एकही धाव करता आली नाही. गेलने 40 चेंडूंत 6 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या. हार्दिक पंड्याच्या अखेरच्या षटकात मयांक अगरवाल आणि मार्कस स्टॉईनिस यांनी तब्बल 22 धावांची लूट केल्यामुळे पंजाबला 174 धावांपर्यंत मजल मारता आली.

 

9.43 PM :  पंजाबचे मुंबईपुढे 175 धावांचे आव्हान

9.31 PM : पंजाबला पाचवा धक्का; अक्षर पटेल बाद

- मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने अक्षर पटेलला बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला. अक्षरने एका षटकाराच्या जोरावर 13 धावा केल्या.

9.25 PM : पंजाबला चौथा धक्का; करुण नायर बाद

- मिचेल मॅक्लेघनने करुण नायरला बाद करत पंजाबला चौथा धक्का दिला. करुणने 12 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 23 धावा केल्या.

9.19 PM : पंजाब 15 षटकांत 3 बाद 123

9.07 PM : युवराज सिंग OUT; पंजाबला तिसरा धक्का

- तिसऱ्या स्थानावर बढती मिळालेल्या युवराजने धावचीत होत आत्मघात केला. युवराजने एका षटकाराच्या जोरावर 14 धावा केल्या.

9.03 PM :  ख्रिस गेल OUT; पंजाबला मोठा धक्का

- अर्धशतक झाल्यावर ख्रिस गेलला एकही धाव करता आली नाही. गेलने 40 चेंडूंत 6 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या.

8.59 PM : ख्रिस गेलचे 38 चेंडूंत अर्धशतक

- ख्रिस गेल हा धडाकेबाड फलंदाज असला तरी मुंबईविरुद्धच्या सामन्यात मात्र गेलला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 38 चेंडूंची वाट पाहावी लागली.

8.52 PM : युवराज सिंगला दोन धावांवर जीवदान

- युवराज सिंगला दोन धावांवर असताना यष्टीरक्षक इशान किशनने दोन धावांवर असताना झेल सोडून जीवदान दिले.

8.40 PM :   पंजाबला पहिला धक्का; लोकेश राहुल बाद

- मयांक मार्कंडेच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल बाद झाला. पंजाबसाठी हा पहिला धक्का होता. राहुलने 20 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 24 धावा केल्या.

8.33 PM :  गेलचा गगनभेदी षटकार

- पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गेलने गगनभेदी षटकार लगावत प्रेक्षकांची मने जिंकली.

8.25 PM : पंजाब पाच षटकांत बिनबाद 37

- गेल आणि राहुल यांनी संयत सुरुवात करत पंजाबला 5 षटकांत 37 धावा करून दिल्या.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर पंजाबला चांगला पाठिंबा.... बघा हा व्हीडीओ



 

8.10 PM : दुसऱ्या षटकातही लोकेश राहुलचा षटकार

8.06 PM :  लोकेश राहुलचा पहिला षटकार

- पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार लगावत झोकात सुरुवात केली.

7.40 PM : मुंबईच्या संघातून कायरन पोलार्डला डच्चू


7.30 : मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला


मुंबईला विजयाचा सूर गवसणार का, पंजाबविरुद्ध आज सामना
इंदूर : पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई इंडियन्सपुढे शुक्रवारी आव्हान आहे ते किंग्ज इलेव्हन पंजाबचे. मुंबईचे आठ सामन्यांमध्ये फक्त दोन गुण आहेत. त्यामुळे त्यांना जर बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना उर्वरीत सामन्यांमध्ये विजय आवश्यक असेल. त्यामुळे या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला तक कदाचित त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल हा भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये गेलचे वादळ येणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

दोन्ही संघ




दोन्ही संघांचे स्टेडियममध्ये आगमन


Web Title: MI vs KXIP, IPL 2018 LIVE: Kieron Pollard dropped from Mumbai squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.