भारत vs अफगाणिस्तान लाइव्ह स्कोअर: भारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही.
11:09 PM
भारताचा अखेर अफगाणिस्तानवर विजय
10:58 PM
अफगाणिस्तानला मोठा धक्का
10:13 PM
अफगाणिस्तानला सहावा धक्का
09:41 PM
चहलने भारताला मिळवून दिले पाचवे यश
09:11 PM
अफगाणिस्तानला सलग दुसरा धक्का
09:01 PM
27 षटकांअखेर अफगाणिस्तानचे शतक पूर्ण
27 व्या षटकामध्ये अफगाणिस्तानचे शतक पूर्ण केले असून दोन बाद 104 धावा झाल्या आहेत.
08:42 PM
अफगाणिस्तानला विजयासाठी १४९ धावांची गरज
08:19 PM
अफगाणिस्तानला दुसरा धक्का
08:08 PM
अफगाणिस्तानची सावध सुरुवात
07:36 PM
अफगाणिस्तानचा पहिला विकेट पडला
अफगाणिस्तानचा पहिला विकेट पडला असून सलमीचा फलंदाज हजरतुल्लाह झझाई हा 10 धावांवर बाद झाला. मोहोम्मद शामीने भारताला हे यश मिळवून दिले.
06:28 PM
केदार जाधवचे अर्धशतक
06:23 PM
भारताला सहावा धक्का
04:47 PM
विजय शंकरच्या 41 चेंडूंत 29 धावा

04:38 PM
विजय शंकर आणि विराट कोहलीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी 63 चेंडूंत अर्धशतक झळकावले
04:00 PM
लोकेश राहुल 53 चेंडूंत 30 धावा करून माघारी परतला

03:58 PM
नबीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात राहुल झेल देऊन माघारी

03:52 PM
लोकेश राहुल व विराट कोहलीची अर्धशतकी भागीदारी
03:34 PM
विराट कोहलीची धडाकेबाज फलंदाजी
02:56 PM
कोहली व धोनी यांना पाहण्यासाठी तिचा कॅनडा ते लंडन प्रवास
02:35 PM
दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संधी.. विजय शंकर पूर्णपणे तंदुरूस्त, त्यामुळे रिषभ पंतला संधी नाही
02:26 PM
विजय शंकर संघात कायम, भुवनेश्वरच्या जागी मोहम्मद शमीची एन्ट्री?
02:19 PM
चाहत्याने मानले कोहलीच्या आई-वडिलांचे आभार
