Asia Cup 2018 : भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना या कारणांसाठी पाहाच...

Asia Cup 2018: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील सामना आज होणार आहे. पाकिस्तान आणि बागंलादेश यांना नमवून भारताने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केले आहे, तर सलग दोन पराभवांमुळे अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:47 AM2018-09-25T10:47:48+5:302018-09-25T10:48:25+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: India-Afghanistan match watch for these reasons | Asia Cup 2018 : भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना या कारणांसाठी पाहाच...

Asia Cup 2018 : भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना या कारणांसाठी पाहाच...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभुवनेश्वरला वन डेत विकेटचे शतक पूर्ण करण्यासाठी चार बळींची आवश्यकता आहे. अशी कामगिरी करणारा तो 12वा भारतीय गोलंदाज ठरणार आहे.वन डे क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण करण्यासाठी रशीदला चार बळी हवे आहेत.

दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील सामना आज होणार आहे. पाकिस्तान आणि बागंलादेश यांना नमवून भारताने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केले आहे, तर सलग दोन पराभवांमुळे अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आजची लढत ही केवळ औपचारिकता असल्याचा क्रिकेट चाहत्यांचा समज असेल तर जरा थांबा. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही आकडेवारी तुमची उत्सुकता वाढवेल... 

  • भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 2014 मध्ये झालेला एकमेव वन डे सामना भारताने आठ विकेटने जिंकला होता.
  • भारताने मागील पाच सामन्यांत चार , तर अफगाणिस्तानने तीन विजय मिळवले आहेत. 
  • आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानला निसटता पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने त्यांच्यावर तीन विकेटने, तर बांगलादेशने तीन धावांनी विजय मिळवला होता.
  • 770 :  चालू वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये शिखर धवन (770) याने विराट कोहली व रोहित शर्मा यांना पिछाडीवर टाकले आहे. त्याची स्ट्राईक रेटही या दोघांपेक्षा अधिक आहे. 
  • 193 : अफगाणिस्तानची संपूर्ण मदार ही फिरकीपटूंवर आहे. जानेवरी 2017 ते आत्तापर्यंत त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी वन डे सामन्यात 193 विकेट घेतल्या आहेत. भारतीय फिरकीपटूंना या काळात केवळ 141 विकेट घेता आल्या आहेत. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंची सरासरीही भारताच्या गोलंदाजांपेक्षा चांगली आहे. 
  • 8 : अफगाणिस्तानच्या रशीद खानने यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमरा आणि मुजीब उर रहमार यांनी प्रत्येकी सात विकेट घेतल्या आहेत.
  • 8 : भुवनेश्वर कुमारला 2018 मध्ये खेळलेल्या दहा वन डे सामन्यात केवळ 8 विकेट घेता आल्या आहेत. सहा वन डे सामन्यांत तर त्याला एकही विकेट टिपता आलेली नाही.
  • 4 : भुवनेश्वरला वन डेत विकेटचे शतक पूर्ण करण्यासाठी चार बळींची आवश्यकता आहे. अशी कामगिरी करणारा तो 12वा भारतीय गोलंदाज ठरणार आहे.
  • 4 : वन डे क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण करण्यासाठी रशीदला चार बळी हवे आहेत.
  • 6 : समिउल्लाह सेनवारीला विकेटचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सहा बळी हवे आहेत.

Web Title: Asia Cup 2018: India-Afghanistan match watch for these reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.