खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 04:09 PM2019-06-10T16:09:59+5:302019-06-10T16:17:58+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती. दीपिकाने स्वत: '८३' चा भाग असल्याचा खुलासा केला आहे. 

wife Deepika Padukone's entry in Ranveer Singh's '83' | खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

googlenewsNext
ठळक मुद्देलग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहेदीपिकाने स्वत: '८३' चा भाग असल्याचा खुलासा केला आहे

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती.  या सिनेमात दीपिका पादुकोणरणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. दीपिकाने स्वत: '८३' चा भाग असल्याचा खुलासा केला आहे. 
आज तकच्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण '83'मध्ये कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियांची भूमिका साकारणार आहे. दीपिकाने हे देखील सांगितले की, '83' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय आणखी कुणी साकारत असते तरी देखील मी हीच भूमिका केली असती. 

लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय. 


१९८३च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारीत या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवि शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: wife Deepika Padukone's entry in Ranveer Singh's '83'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.