‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये कुठेच का नव्हता संजय दत्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:17 AM2018-07-26T11:17:49+5:302018-07-26T11:18:19+5:30

संजय दत्तचा ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. साहजिकचं त्याआधी प्रमोशनचा धडाका असणार. पण चित्रपटाची रिलीज डेट दोन दिवसांवर येऊनही ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये संजूबाबा कुठेही नाही. 

why Sanjay Dutt is missing from the promotions of 'Saheb, Biwi Aur Gangster 3' | ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये कुठेच का नव्हता संजय दत्त!

‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये कुठेच का नव्हता संजय दत्त!

संजय दत्तचा ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. साहजिकचं त्याआधी प्रमोशनचा धडाका असणार. पण चित्रपटाची रिलीज डेट दोन दिवसांवर येऊनही ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनमध्ये संजूबाबा कुठेही नाही. आता यामागचे कारण जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केला आणि संजूबाबाकडे जराही वेळ नसल्याचे आम्हाला कळले. होय, संजय दत्त सध्या प्रचंड बिझी आहे. त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. खरे तर संजयने ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’च्या प्रमोशनसाठी थोडा तरी वेळ काढावा, असे निर्मात्यांना वाटत होते. पण ‘तोरबाज’ आणि ‘प्रस्थानम’ या दोन्ही चित्रपटाच्या शूटींगमध्ये तो असा काही गुंतला की, प्रमोशनसाठी तो एक दिवसाचाही वेळ काढू शकला नाही. आधी त्याने ‘तोरबाज’चे शूटींग केले आणि ते संपत नाही तोच तो ‘प्रस्थानम’च्या शूटींगला लागला. या धावपळीत ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’चे सोशल मीडियावर प्रमोशन करण्याव्यतिरिक्त संजयने काहीच केले नाही.
‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ यापाठोपाठ ‘तोरबाज’,‘प्रस्थानम’, ‘पानीपत’ आणि ‘कलंक’ असे अनेक चित्रपट संजयकडे आहेत.

'साहेब बीबी और गँगस्टर-3' हा सिनेमा 27 जुलैला प्रदर्शित होईल. याच दिवशी संजय दत्तचा वाढदिवसही असतो. 2011मध्ये 'साहेब बीबी और गँगस्टर' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेा जिमी शेरगील, माही गिल आणि इरफान खान प्रमुख भूमिकेत होते. तर या सिनेमाचा सिक्वेल 2013मध्ये आला होता. 'साहेब बीबी और गँगस्टर'च्या सिरीजमधील हा तिसरा सिनेमा असून या सिनेमातून दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया काहीतरी वेगळं सादर करण्याच्या तयारीत आहेत. 

Web Title: why Sanjay Dutt is missing from the promotions of 'Saheb, Biwi Aur Gangster 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.